सराहन
सिमला जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग २२ च्या आसपास २५-३० किलोमीटर आत गेलं तर सराहन,
चायल सारखी अनेक ठिकाणं आहेत की ज्या ठिकाणी जाऊन आपण हिमालयात निवांतपणे
भटकण्याचा आनंद घेवू शकतो. अगदी चार रात्री पाच दिवसाचा कार्यक्रम आखून चंदीगढहून निघाल्यास
या दोन्ही ठिकाणचा प्रवास संस्मरणीय होऊ शकतो. सराहान हे ठिकाण सिमल्या पासून १८० किलोमीटरवर आहे.
सराहानला आम्ही हॉटेल श्रीखंड मध्ये राहिलो होतो. हिमाचल प्रदेश पर्यटन महामंडळाचं हॉटेल श्रीखंड
(समोरच दिसणार्या श्रीखंड महादेव पर्वतावरून हे नाव ठवलं आहे.) अशा ठिकाणी आहे की
संपुर्ण सराहान व्हालीचं दर्शन अगदी प्रत्येक खोलीतून होतं. फक्त हॉटेलमध्ये
विश्रांती घेणार्यालाही इथे शांती लाभू शकेल. जवळच पुरातन कालीन भिमाकाली मंदीर
परिसर आहे. बुशहर संस्थानची राजधानी असलेलं हे ठिकाण असून भिमाकाली मंदीर हे
एकावन्न शक्तिपीठांपैकी एक आहे. पुरातन वास्तूकलेचा उत्तम नमूना असलेलं भिमाकाली
मंदीर देखणं आहे. लाकूड आणि धातूमध्ये केलेलं कोरीव काम हे या मंदीराचं वैशिष्ट्य
आहे. चहूबाजूंनी हिमाच्छादीत शिखरांनी वेढलेल्या या ठिकाणी राहण्याचा आनंद काही
औरच आहे.
चायल
चायल सिमल्या पासून ४४ किलोमीटरवर आहे. पतियाळाच्या महाराज्यांचं हे
उन्हाळ्यातील वास्तव्याच ठिकाण असून संपुर्ण भाग देवदार वृक्षांनी वेढला आहे. चायल
आता अभयारण्य म्हणून घोषीत झालं असून जंगलाचा बर्यापैकी अनुभव घेता येतो.
No comments:
Post a Comment