उलटी
होती पाने झटपट
उकलत
जातो असाच हा पट
कुणी
कितीही केली खटपट
नाही
थांबत उधळे चौपट
येती
लाटा भरतीच्याही
परतून
जाती ओहोटी ही
सुख-दु:खाची
वीण तर ही
सागर, तीरी जपतो तरीही
दिवसामागूनी
दिवसही सरले
ऋतूमागूनी
ऋतू चालले
कुणी
मांडीला असेल हा पट?
नाटक
करतो कुठला हा नट?
रडवी कधी हा हसता हसता
कोठे जावे? कुठला रस्ता?
माहीत नाही... तरी चाललो
नवीन वर्षा तुझ्या स्वागता
नरेंद्र
प्रभू
३१/१२/२०१९