पेटीत अडकला एक साप
म्हणाला; काय झाले हे बाप रे बाप!
बाहेर पडायची केली
खुप धडपड
वळवळला, सरपटला, लोळला गडबड
थकून गेला, पडून राहिला
आले ना कुण्णी
मदतीला
म्हणतो असाच लागलो
लोळायला
तर किती वेळ लागतो
मरायला?
लागला विचार करायला
कसं होईल
तरायला.....?
एवढ्यात; झाला थोडा खडखडाट
फटीतून एक उंदीर
आला आत
पेटीतलं खाणं खाणार
म्हणून
पाहू लागला ऐटीत
बसून
समोर पाहतो तर काय
थरथरू लागले त्याचे
पाय
काळसर्प समोर उभा
पळायची पण नाही
मुभा
सर्प आता खाणार मला
चिमुरडा उंदीर
अधिकच भ्याला
सापाने थोडा विचार
केला
काम करेल हा या
समयाला
मग, साप त्याला हळूच म्हणाला
मदत कर बाहेर
पडायला
कुरतडून टाक पेटीला
अपाय नाही करणार
तुला
उंदीर पटकन तयार
झाला
म्हणाला जिवावरचा
घाला गेला
भोक पाडलं त्याने
पेटीला
साप पेटीतून बाहेर
आला
उडी मारून उंदीरही
पळाला
साप त्याला पकडता
झाला
पेटीतून साप सुटला
शिवाय उंदीर मिळाला
खायला
जीव वाचला अन्
घासही मिळाला
असा अर्थ आहे या
पुराण कथेला
No comments:
Post a Comment