खलील जिब्रानच्या गोष्टीतील कोल्हा
एकदा निघाला पहायला
आपला जिल्हा
त्याने गाठला जवळचाच
किल्ला
वरून न्याहाळतो तर केवढा
मोठा पल्ला
पडली होती सकाळची कोवळी
उन्ह
त्याने पाहिली आपलीच
सावली लांबून
कित्ती मोठ्ठा मी पहा
माझी शान
लागेल शिकार मला हत्तीचीच
मान
निघाला ऐटीत शेपटी हालवत
छान
शिकार थोडीच येणार होती
गुमान
दमला भागला उभा राहिला
थकून
बघतो हे काय... पायाखाली
वाकून
सगळीकडे पसरलं होतं
दुपारचं उन
आली सावली पायाखाली
दाटून
तो इवलासा गेला आता
थकून
म्हणला आता ससाच टाकतो
खाऊन
लांब सावली, तू तेव्हढाच
खरंच आहेस नखाएवढाच
नको हा माज, दुसर्याला जाच
डोक्यावरचा सुर्य सर्वांचा
तेव्हढाच
I simply want they'd better options for payback payments.
ReplyDeletehello!,I love your writing so so much! proportion we be in contact extra
ReplyDeleteabout your article on AOL? I require an expert in this house to resolve my problem.
May be that is you! Having a look forward to look you.