किती तुझी जीभ लांब?
अरे कुठेतरी थांब!
ज्याच्यावर कालपर्यंत केले वार
त्याचाच आज घेतोस कैवार?
नाचतो आहेस होऊन सांब
पण आहेस एकच खांब
असा कसा आलाय रे उत
तू कुणाचा आहेस दुत
धुतराष्ट्रालाही माहित आहे हा खोटं बोलतोय
संशय आलाय, हा नावाचाच आहे तो जाणतोय
जय कसा होणार तो ममोमन खचतोय
यमाचा रेडा बघा त्याला सोडूनच पळतोय
आंधळा खानदान(पक्ष) नष्ट होताना बघतोय
निती तिथेच असतो विजय
तुला लोळवणार बारामतीचा पैलवान
जो आहे इटालियनचा बागवान
बगलमे छुरी आणि तोंडात राम
आंध्रबाबूला बघ फुटलाय घाम
बाजारबुणगे तुला घेऊन नाचतात
तुझ्याजवळ ‘आकडा’नाय ते जाणतात
म्हणे आम्ही नितीवान
असे किती लोळवलेत खान
बेडकाचा होतो का कधी सांड?
चव्हाट्यावर किती ही भांडाभांड?
आपणच म्हटलं रांड...
तर जग म्हणतंचना सांड?
रस्त्यावरच्या खड्यात पेंग्वीन कसा जगेल
इतकं खाऊन पालिका कशी तरेल
बेस्टची गाडी पहिली रुळावर आण
नाही रे ती सोन्याची खाण
पोरगं आहे ते, त्याला नाय जाण
जनता आहे ती काढेल पायताण
विश्वासाला तडा गेलाच, तो आता ढळतोय
दोन मातोश्री झाल्या, आता कसला फळतोय?
महाराष्ट्र ‘जळ’तोय, पाऊस असा छळतोय
हुरळून नको जावू मिडिया तुख्याशी खेळतोय
कापून घेवू नको नाक
वल्गना नको होशील खाक
टाळ्या पिटताहेत बघून तुझ्या कसरती
तुला केव्हा होणार आहे उपरती?
गुरगुरणारा शिकार करीत नसतो
गरजणारा तरी कुठे बरसतो?
आत्मघाताची तुला आलीय खाज
म्हणून चोळतोयस सोडून लाज
इतिहासात नको राहू, त्याच्यापासून शिक
जे स्वत:च नागडे ते घालतील का भिक?
बहकू नकोस, म्हणतील स्वत:लाच विक
रामराम करतील ते नाहीत भाविक
म्हणून म्हणतो कुठेतरी थांब!
हातातला ‘जाम’ ठेव जरा लांब
No comments:
Post a Comment