31 January, 2019

चिप असलेला इ पासपोर्ट





भारताचे दूतावास आणि वाणिज्य दूतावास पासपोर्ट सेवा प्रोजेक्ट व्दारे विश्वस्थरावर जोडले जाणार आहेत. पासपोर्ट सेवेला जोडलेली एक केंद्रीकृत प्रणाली तयार होत असून लवकरच चिप आधारित ई-पासपोर्ट जारी केले जाणार आहेत.

पंतप्रधान नरेन्द्र मोदी यानी ही माहिती प्रवासी भारतीय दिवसाच्या समारोहात दिली आहे. परदेशात जाण्यासाठी लागणारे व्हीसा मिळणं यामुळे सुलभ होईल. या क्षेत्रात आधुनिकता आणून देश पुढे जात आहे.    

२०१९ साली पुन्हा मोदी सरकारच निवडून आलं पाहिजे, असं का? याचं हे एक कारण आहे.




30 January, 2019

मराठी तरुणाची अभिनव देशसेवा




सियाचीनमधील जवानांसाठी थंडी आणि शत्रूपासून बचाव करणारा पोशाख..
सियाचीन या जगातील सर्वात उंचीवरील आणि सर्वाधिक गारठा असलेल्या युद्धभूमीवर तैनात भारतीय जवानांसाठी नाशिकमधील १९ वर्षीय अजिंक्य जाधव या युवकाने भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) मार्गदर्शनाखाली खास पोशाख तयार केला आहे. तो थंडी आणि शत्रू या दोघांपासून बचाव करणारा आहे.

या विशेष पोशाखाला संरक्षण मंत्रालयाने अनुकूलता दर्शविली आहे. हा पोशाख वजनाने कमी आहे. शिवाय गोळीबारात जखमी जवानावर उपचारकरणाराही आहे. महत्त्वाची बाब म्हणजे सभोवतालच्या वातावरणानुसार त्याचा रंग बदलतो. त्यामुळे जवानाचा थांगपत्ता शत्रूला लवकर लागणार नाही, अशी त्याची रचना आहे.

देशाच्या सीमांवर तैनात जवानांबद्दल अजिंक्यच्या मनात लहानपणापासून आत्मीयता होती.  एखादा पोशाख जवानाचा बचाव कसा करू शकतो, याचा विचार करून शालेय प्रदर्शनासाठी त्याने एक जॅकेटतयार केले. कालांतराने त्यात त्याला आणखीही काही सुधारणा सुचल्या. मात्र आर्थिक आधार भक्कम नसल्याने त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांना पत्र पाठविले. त्यानंतर दहशतवादविरोधी पथकातील काही अधिकाऱ्यांनी त्याला भेटायला बोलावून त्याचा प्रकल्प समजून घेतला. या संदर्भात काही सूचना केल्या. गुवाहाटी येथील आयआयटीमध्ये प्रकल्प सादरीकरणासाठी त्याला निमंत्रित करण्यात आले होते. तिथे सेनादलांचेही शिबीर होते. त्यात सहभागी कर्नल संतोष रस्तोगी यांनी त्याचा प्रकल्प समजावून घेत त्याला सियाचीनमधील सैनिकांसाठी काय करता येईल, असा प्रश्न विचारला. सियाचीनची भौगोलिक परिस्थिती, नैसर्गिक संकटांची शक्यता, सैनिकांना येणाऱ्या अडचणी, शत्रूकडून गोळीबाराचा असणारा धोका आदींची कल्पना दिली. अजिंक्यने या  प्रकल्पावर काम सुरू केले. सियाचीन भागात कमालीचे घसरणारे तापमान, हिमवादळे यामुळे जवानांना भेडसावणाऱ्या अडचणी, या सर्वाचा अभ्यास करून पोशाखाची रचना करण्यात आली. ही रचना  प्रभावी होण्यासाठी इस्रोने त्याला मार्गदर्शन केले.  सध्या सियाचीनमधील सैनिकांचा पोशाख श्रीलंका येथील कंपनी तयार करते.

पोशाखाची वैशिष्टय़े
सियाचीनसारख्या थंड प्रदेशात कार्यरत जवानांची निकड लक्षात घेऊन पोशाखाची रचना.
त्यात आपोआप औषधोपचाराची व्यवस्था आहे. म्हणजे सैनिकाला गोळी लागताच जॅकेटवर त्या ठिकाणी ब्लास्टहोत त्या नेमक्या भागावर आवश्यक वेदनाशामक गोळी किंवा औषध पसरेल.

सियाचीनची बर्फवृष्टी लक्षात घेऊन पोशाखात चार थर. त्यामुळे सैनिकांचे थंडीपासून रक्षण.

सिलिका जेलच्या वापरामुळे पोशाखाचे वजन अतिशय हलके.

हा पोशाख सभोवतालच्या वातावरणानुसार रंग बदलत असल्याने दूरवरून जवान सहज हुडकता येणे कठीण.

या अभिनव प्रकल्पाला वेळीच दाद देऊन तो पुर्णत्वाला नेणारं सरकार पुन्हा निवडून द्यायला हवं.

२०१९ साली पुन्हा मोदी सरकारच निवडून आलं पाहिजे, असं का? याचं हे एक कारण आहे.


29 January, 2019

पणजीचा केबल ब्रिज वाहतूकीसाठी खुला




पणजीचा केबल ५.१ किमी लांबीचा ब्रिज वाहतूकीसाठी खुला करण्यात आला आहे. पणजीची वाहतूक समस्या आणि गोवा-मुंबईमधल्या वाहतूकीचा वेग वाढवणार्‍या या पुलाची पायाभरणी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली केली होती.

केंद्रीय रस्ते वाहतूक व राजमार्ग मंत्री श्री. नितिन गडकरी यांनी रविवार गोव्याच्या मांडवी नदी वरच्या यापुलाचं उद्घाटन केलं. चार मार्गिक असलेल्या या पुलामुळे गोव्याची राजधानी पणजीचा वाहतूक भार कमी होऊन बंगळूरुहून मुंबईकडे जाणारी वाहनं या पुलावरून सरळ NH-17 वर जाऊ शकतील.

रोज साधारण ६६,००० वाहनांचा तासंतास होणारा खोळंबा यामुळे वाचणार आहे. एवढंच नाही तर राज्याच्या पर्यटनातही वाढ होणार आहे.

२०१९ साली पुन्हा मोदी सरकारच निवडून आलं पाहिजे, असं का? याचं हे एक कारण आहे.




28 January, 2019

काश्मीरमधला बारामूला जिल्हा दहशतवाद मुक्त











गेली ३०-३५ वर्षं काश्मीरमधला बारामूला हा जिल्हा आतंकवाद प्रभावीत म्हणून जगासमोर आला आहे. पण हाच जिल्हा आता जम्मू-काश्मीर पोलिसांनी दहशतवाद मुक्त म्हणून घोषीत केला आहे. या ठिकाणी नुकतेच तीन दहशतवादी मारले गेले आणि त्यानंतर पोलिसांनी हा जिल्हा दहशतवाद मुक्त म्हणून जाहीर केला.  

बारामूला मधलं सोपोर हे ठिकाण मोठ्या प्रमाणात दहशतवाद प्रभावीत होतं. या जिल्ह्यातील उरी या ठीकाणी २०१६ मध्ये हल्ला झाला होता आणि आपल्या लष्कराचे १६ जवान कामी आले होते. त्या नंतरच सर्जिकल स्ट्राइकव्दारे त्या हल्ल्याला उतर दिलं गेलं होतं.

अशा ठिकाणी कठोर कारवाई करून आपल्या सैन्याने दहशतवाद्यांना धडा शिकवला आहे.

२०१९ साली पुन्हा मोदी सरकारच निवडून आलं पाहिजे, असं कायाचं हे ही एक कारण आहे.


27 January, 2019

जगातील सर्वात उंच बिलासपूर-मनाली-लेह रेल्वे लाईन







भारत चीन सीमारेषेवर असलेली जगातील सर्वात उंचबिलासपूर-मनाली-लेह रेल्वे लाईनचं काम जोरावर असून ते २०२२ सालापर्यंत पुर्ण होईल. हिमाचल प्रदेश मधल्या मंडी, कुल्लू, मनाली, केलॉन्ग मधून प्रवास करीत ही रेल्वे जम्मू-काश्मिरच्या लेह-लडाख पर्यंत पोहोचणार आहे.           

२७ जून २०१७ रोजी तत्कालिन रेल्वेमंत्री श्री. सुरेश प्रभू यांच्या हस्ते सदर रेल्वेलाईन बांधणीचा शुभारंभ लेहामध्ये संपन्न झाला होता.  

या प्रकल्पाचे महत्वाचे मुद्दे पुढील प्रमाणे आहेत.  

1.      ३० रेल्वे स्थानकं असलेल्या बिलासपूर-मनाली-लेह रेल्वे मार्गावर लेह, कारू, उप्शी, दारचा, कोकसर, केलॉन्ग, मनाली, मंडी आणि सुरेंद्रनगर अशी महत्वाची स्थानकं असतील.

2.      ४६५ किमी लांब असलेली ही जगातील सर्वात उंच रेल्वे लाईन असेल.  समुद्र सपाटीपासून १७,५८५ फूट उंचीवरचं यातलं सर्वात उंचीचं स्थान असेल.

3.      या मार्गातला ५२% भाग हा भुयारातून जाणारा असून २७ किमीचा बोगदा हा सर्वात लांब बोगदा असाणार आहे, तर सर्व बोगद्यांची लांबी २४४ किमी. होणार आहे. या प्रकल्पात एकूण ४०० छोटे आणि १२४ मोठे पुल असणार असून ७४ बोगदे खोदले जाणार आहेत       

4.      प्रकल्प पुर्ण झाल्यावर इथली ट्रेन ताशी  ७५ किमी वेगाने धावेल आणि मग नवी दिल्ली ते लेह हे अंतर ४० तासांऐवजी २० तासांवर येईल. 

5.      ही रेल्वे लाईन फक्त प्रवाशांनाच नव्हे तर भारतीय लष्कराच्या दृष्टीनेही फार महत्वाची ठरणार असून लेह-लडाखच्या विकासात मोलाची भर घालणार आहे.

6.      लष्करीदृष्ट्या अत्यंत महत्वाचा, लडाखला १२ महिने जोडणारा आणि पाक अधीकृत काश्मिरपासून दूर असलेला हा मार्ग वेगाने पुर्ण करण्यात मोदी सरकार मोलाची कामगिरी बजावत आहे.



२०१९ साली पुन्हा मोदी सरकारच निवडून आलं पाहिजे, असं का? याचं हे एक कारण आहे.
  

26 January, 2019

‘मेक इन इंडीया’ मेट्रोचे डबे ऑस्ट्रेलियाला रवाना






मेड इन इंडियाच्या मेट्रो आता ऑस्ट्रेलियात दिसायला लागतील. कारण मोदी सरकारने राबविलेल्यामेक इन इंडिया अंतर्गत भारताने ऑस्ट्रेलियाला मेट्रोच्या डब्यांची निर्यात केली आहे. गुजरातच्या बडोदा येथे तयार करण्यात आलेल्या या डब्यांना मुंबई बंदरातून ऑस्ट्रेलियात पाठविण्यात आले. एकूण ४५० डबे भारताकडून ऑस्ट्रेलियाला पुरविण्यात येणार आहेत.

ऑस्ट्रेलियाला पाठविलेल्या कोचची लांबी १५ फुट आणि वजन ४६ टन असून मुंबई पोर्ट ट्रस्टने हे कोच लोड करण्याचे काम केले. भारताच्या पोत परिवहन मंत्रालयाने याची माहिती दिली आहे. एकूण ४५० कोच ऑस्ट्रेलियाला देण्यात येणार आहेत. मेट्रो कोचसाठी जगात प्रसिद्ध असलेल्या बॉमबार्डियर नावाच्या कंपनीने बडोद्याजवळ सावलीत कारखाना सुरु केला आहे. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाला पहिल्यांदाच संपूर्ण मेट्रो निर्यात केली जाणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या क्विन्सलंडने सहा कोच असलेल्या ७५ मेट्रो ट्रेनचा ऑर्डर या कंपनीला दिला आहे. त्यासाठी सुमारे . बिलियन डॉलरचा करार करण्यात आला आहे.
आजपर्यंत विदेशी बनावटीचे कोच भारतात आयात करण्यात येत असत, आतामात्र भारतातून विदेशात असे कोच पाठवण्यात येत आहेत.   

२०१९ साली पुन्हा मोदी सरकारच निवडून आलं पाहिजे, असं का? याचं हे एक कारण आहे.



25 January, 2019

केरळचा कोल्लम बायपास




केरळचा कोल्लम बायपास


गेली ४५ वर्षं रखडलेला केरळमधील कोल्लमचा राष्ट्रीय महामार्ग 66 वरील 13 किलोमीटर लांबीचा दुपदरी कोल्लम बायपास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हल्लीच राष्ट्राला समर्पित केला. पायाभूत विकासाला सरकारचे प्राधान्य आहे आणि कोल्लम बायपास हे याचे उदाहरण आहे, असे याप्रसंगी झालेल्या सभेमध्ये पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

कोल्लम बायपासमुळे अलाप्पुझा आणि तिरुअनंतपुरम दरम्यान प्रवासाचा वेळ कमी होईल आणि कोल्लम शहरातील वाहतूक कोंडी दूर होईल.

रस्ते जोडणीतील 'प्रगती' अधोरेखित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, यापूर्वीच्या सरकारच्या तुलनेत राष्ट्रीय महामार्ग, ग्रामीण रस्ते बांधणीचा वेग जवळपास दुप्पट आहे. आधीच्या सरकारमधील 56 टक्क्‌यांच्या तुलनेत आज 90 टक्क्‌यांहून अधिक ग्रामीण गावे जोडण्यात आली आहेत. लवकरच 100 टक्के ग्रामीण रस्ते जोडणीचे उद्दिष्ट सरकार पूर्ण करेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. प्रादेशिक हवाई संपर्क आणि रेल्वेमार्गांच्या विस्तारामुळे लक्षणीय सुधारणा झाली असून यामुळे रोजगार निर्मिती झाली आहे.जेव्हा आपण रस्ते आणि पुल बांधतो तेव्हा शहरे आणि गावे जोडत नाही तर आपण महत्त्वाकांक्षांना कामगिरीशी जोडतो, आशावादाला संधींशी जोडतो आणि आशेला आनंदाशी जोडतो, असे पंतप्रधान म्हणाले.

पर्यटन हा केरळच्या आर्थिक विकासाचा कणा असून राज्याच्या अर्थव्यवस्थेत त्याचे प्रमुख योगदान आहे. केरळची पर्यटन क्षमता ओळखून सरकारने स्वदेश दर्शन आणि प्रसाद योजनांतर्गत राज्यात सात प्रकल्पांना मंजुरी दिली असून यासाठी 550 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे, असे त्यांनी सांगितले.

२०१९ साली पुन्हा मोदी सरकारच निवडून आलं पाहिजे, असं का? याचं हे एक कारण आहे.




24 January, 2019

बोगीबिलचं राष्ट्रार्पण







काही दिवसांपुर्वी ब्रह्मपुत्र नदीवरच्या देशातील सर्वात लांब डबल डेकर रेल्वे आणि रस्ते पुलाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं.

आसाममधील दिब्रुगढजवळील बोगिबिल येथे ब्रह्मपुत्र नदीवर बांधलेला हा पूल सुमारे ४.९४ किमी लांब आहे.

सुरक्षा धोरणांच्या दृष्टिकोनातून हा पूल खूप महत्वाचा मानला जातो. प्रचंड लष्करी टॅंकर  या पुलावरून सहज पार होऊ शकतात.

१९६२ च्या युद्धानंतर या पुलाची मागणी केली गेली होती. तसंच १९८५च्या  आसाम कराराच्या हा पुला हा एक भाग होता. मोदी सरकार २०१४ साली सत्तेवर येताच त्यानी या पुलाच्या बांधणीत लक्ष घातलं आणि कित्येक दशकं रेंगाळणारं हे काम अत्यंत वेगाने पुर्ण करीत तो वाहतूकीसाठी खुलाही केला.

२०१९ साली पुन्हा मोदी सरकारच निवडून आलं पाहिजे, असं का? याचं हे एक कारण आहे.

या पुलामुळे आसाम आणि अरुणाचल प्रदेश दरम्यानचा प्रवास चार तासांनी कमी होईल. आणि तो 3 तासांत पूर्ण करता येईल.

सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे या पुलाची अरुणाचल प्रदेशच्या सीमावर्ती भागात पोहोचण्यासाठी भारतीय सैन्याला मदत होईल.



23 January, 2019

स्वातंत्र्यानंतर ७२ वर्षांनी लेह आणि कारगिल नॅशनल पॉवर ग्रिडला जोडली गेली आहेत






वर्षाच्या सुरूवातीस आपल्या देशाने आणखी एक नवीन यश मिळविले आहे. स्वातंत्र्यानंतर ७२ वर्षांनी लेह आणि कारगिल ही ठिकाणं आता नॅशनल पॉवर ग्रिडमध्ये सामील झाली आहेत. हे काम पंतप्रधान मा. नरेंद्र मोदींच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आणि या प्रकल्पातील गुंतवणूकीमुळे पूर्ण झाले आहे. आता 220 केव्ही लेह-कारगिल-ऑल्स्टेंग सिंगल सर्किट ट्रांसमिशन लाइन 330 किलोमीटरपर्यंत वीज पुरवण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. या प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर, देशाच्या या उत्तरी भागांमध्ये २४x वीज पुरविली जाईल. पूर्वी ते कोणत्याही पॉवर ग्रिडशी जोडलेले नव्हते. याच कारणासाठी लेहला वीजेसाठी लहान हायड्रो-प्लांट्सवर अवलंबून राहावे लागत होतं. २०१३ पुर्वीपर्यंत तर या भागात डिझेल वरच्या जनरेटवरच सारी भिस्त होती. परंतु आता नॅशनल पॉवर ग्रिडला जोडले गेल्याने लेहला पुरेशी वीज मिळेल.


२०१९ साली पुन्हा मोदी सरकारच निवडून आलं पाहिजे, असं का? याचं हे एक कारण आहे.  

https://hindi.rightlog.in/2019/01/leh-kargil-national-grid-02/

https://timesofindia.indiatimes.com/india/ladakh-kargil-finally-plug-in-to-national-power-grid/articleshow/67547103.cms


22 January, 2019

‘उरी’ आतंकी हल्ला आणि सर्जिकल स्ट्राईक



२००६ मुंबई लोकल ट्रेन्समध्ये झालेले स्फोट, २००७ साली समझौता एक्सप्रेसमध्ये झालेले स्फोट, २००८ मुंबईवरचा आतंकी हल्ला, २००८ अहमदाबाद स्फोट,  २००८ बंगलोर स्फोट, २०१० पुणे जर्मन बेकरीत स्फोट, २०११ मध्ये मुंबईत पुन्हा झालेले स्फोट, आझाद मैदानात रझा अकादमीने केलेला थयथयाट, महिला पोलिसांची त्यात झालेली मानहानी अशी एकामागोमाग एक बॉम्बस्फोटांची आणि अतिरेकी हल्ल्यांची जंत्री भारतातल्या लोकांना काँग्रेस सरकारच्या राज्यात आगतिकपणे सहन करावी लागली आहे. वर 'बडे बडे देशोमें ऐसी छोटी छोटी बातें होती रेहेती है हा उद्दामपणाही ऐकावा लागला आहे. 'उरी' च्या  निमित्ताने थिएटरमध्ये भारतीय सैन्याच्या पराक्रमाचा लोकांना वाटणारा अभिमान ही त्या सगळ्या क्षणांची आणि हल्ल्यांची मनात साचलेली अगतिकता असते.

उरीच्या हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने केलेल्या सर्जिकल स्ट्राईक्सनी ही अगतिकता नाहिशी केली. कोणीही यावं आणि टपली मारून जावं, असा भारत आता उरलेला नाही.

पुन्हा मोदीच का? याचं हे एक कारण आहे.  


पुन्हा मोदीच का?





येत्या लोकसभा निवडणूकांमध्ये पुन्हा मोदी सरकारच निवडून आलं पाहिजे, असं का? याची अनेक कारणं आणि सकारात्मक बाजू आजपासून मांडाण्याचा प्रयत्न करणार आहे. अच्छे दिन आनेवाले है। म्हणत सत्तेवर आलेल्या या सरकारने तसा प्रामाणिक प्रयत्न केला आहे का? मोदी सरकारच्या अनेक योजना केवळ एका वर्गासाठीच आहेत का? केवळ एकगठ्ठा मतं मिळावीत म्हणून निर्णय न घेता सर्व समावेशक असा राजकारभार या सरकारने केला आहे का? याचा धांडोळा या लिखाणात घेण्यात येईल. जे झालं ते समोर आणण्याचा प्रयत्न आहे. 


LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates