|
अक्षरधाम मंदीर – गांधीनगर, गुजरात |
ईशा टुर्ससोबत
नुकत्याच भेट दिलेल्या अक्षरधाम मंदीराबद्दल:
गुजरातमधील प्रमुख सांकृतीक केंद्रांपैकी
एक मानलं गेलेलं अहमदाबाद जवळच्या गांधीनगर इथलं अक्षरधाम मंदीर म्हणजे आधुनीक
काळात साकार झालेली सुंदर कलाकृती आहे. भगवान स्वामीनारायण यांना समर्पित केलेलं
हे मंदीर बांधण्याआधी संबंधीत साधुंच्या कमिटीने जगभरातील ऐतिहासीक तसंच पुरातन
इमारतींचा आणि देवळांच्या बांधणीचा, स्थापत्यकलेचा, ठेवणीचा सखोल
अभ्यास केला. सदर भगवान स्वामीनारायण मंदीर बांधताना त्या सर्वांचा विचार करून
आराखडा तयार करण्यात आला. १४.८ एकर जमिनीवर ६००० मेट्रिक टन लाल बलुआ दगडाचा वापर
करून साकार झालेलं हे मंदीर १३ वर्षात बांधून तयार झालं.
|
भगवान स्वामीनारायण यांची सात फुट उंच सोन्याची बैठी मुर्ती |
स्वामीनारायण घनश्याम पाण्डे तथा स्वामीनारायण
तथा सहजानन्द स्वामी (२ एप्रिल १७८१ – १ जून १८३०), हे हिंदू धर्माच्या स्वामिनारायण
संप्रदायाचे संस्थापक होते. स्वामिनारायण संप्रदायाचे अनुयायी त्यांना भगवान स्वामिनारायण
म्हणून ओळखतात. वडील श्री हरिप्रसाद आणि माता भक्तिदेवी यांच्या पोटी जन्मला आलेल्या
या बालकाच्या हातावर पद्म आणि पायावर बज्र, ऊर्ध्वरेषा तसंच कमळाचं चिन्ह पाहून ज्योतिषाने हे बालक लाखों लोकांच्या जीवनाला
योग्य मार्ग दाखवेल अशी भविष्यवाणी केली होती जी तंतोतंत खरी ठरली.
स्वामीनारायण पाच वर्षांचे असताना त्यांना
अक्षर ओळख करून देण्यात आली. आठव्या वर्षी मुंज झाल्यावर त्यांनी शास्त्रांचा अभ्यासा
सुरू केला. लवकरचात्यांनी घराचा त्याग करून पुढची सात वर्षं देश्भर भ्रमण केलं. लोक
त्यांना नीलकंठ म्हणून ओळखू लागले. उत्तरेला
हिमालय, दक्षिणेत कांची, श्रीरंगपुर, रामेश्वरम् अशा स्थानांचा
त्यानी वेध घेतला. नंतर पंढरपुर, नासिक करत ते गुजरातमध्ये पोचले. स्वामीनारायण सम्प्रदायाचे लाखो अनुयाय्री
असून हा सम्प्रदाय वेदांवर आधारीत आहे.
तीन मजल्यांवर विस्तार असलेल्या अक्षरधाम
मंदीराच्या मुख्य इमारतीत भगवान स्वामीनारायण यांची सात फुट उंच सोन्याची बैठी
मुर्ती असून, शेजारीच
राधा-कृष्ण, राम पंचायतन, पार्वती महादेव
अशा मुर्तीही शुशोभीत करण्यात आल्या आहेत. पहिल्या मजल्यावर मंदीर निर्माणाविषयीची
दृश्य आणि चित्र गॅलरी असून तळ मजल्यावर स्वामीनारायण संप्रदायाचे संस्थापक स्वामीनारायण
तथा सहजानन्द स्वामी यांच्या वापरातील वस्तू आणि जीवन चरीत्राचा आढावा घेणारं
प्रदर्शन मांडलं आहे. मंदीराच्या प्रशस्त आवारात उजव्या बाजूला तीन मोठे हाईटेक प्रदर्शन
हॉल असून त्यात ध्वनी-प्रकाशाच्या सहाय्याने भगवान स्वामीनारायण यांचं जीवन चरीत्र
दाखवलं आहे. पुढे एका आलिशान चित्रपटगृहात चित्ताकर्षक सिनेमा दाखवला जातो जो
तांत्रीक दृष्ट्या आणि आशयानेही अतिशय चांगला आहे.
अक्षरधाम हे ते स्थान आहे जिथे कला
चिरयुवा आहे, संकृती असीमित आहे
आणि मुल्य कालातीत आहे असं म्हटलं जातं. संपुर्ण २३ एकर परिसर हिरवागार असून
बाग-बगीच्या आणि कारंज्याने सजवलेला आहे. रेस्टोरंटच्या जवळच असलेल्या भव्य
पटांगणात सायंकाळी ७.३० वाजता (सोमवार खेरीज) दाखवण्यात येणारा ‘सत् चित् आनंद’ लेसर शो हा जगातील
सर्वोत्तम तंत्रज्ञान वापरून सादर केलेला ४५ मिनिटांचा वॉटर शो आहे. नचिकेत आणि
यमराज यांच्या मधला संवाद आणि पौराणीक कथा ही मुळातूनच पहाण्याजोगी असून हा मनमोहक
लेसर शो जागतीक दर्जाचा आहे.