पत्रकारीता आणि माध्यमं
याना लोकशाहीचा चौथा खांब म्हटलं जातं. समाजाच्या स्वास्थ्यासाठी, प्रगतीसाठी आणि उज्वल भविष्यासाठी सदैव सतर्क असणारा सच्चा पत्रकार हा
खरोखरच पाशवी सत्तेलाही खाली खेचू शकतो. नमवू शकतो. पण आजच्या काळातील बहुतेक
प्रत्रकारीता ही कुठलातरी अजेंडा नक्की करून, सनसनाटी
बातम्या देण्याच्या अहारी जावून, देश विघातक शक्तींना मदत
करताना आढळते. समाज प्रबोधन करण्यापेक्षा समाजात दरी निर्माण करण्याचं काम करते.
दहशतावादी, बलात्कारी आणि देशाच्या शत्रूची बाजू लढवू पहाणार्या
अशा लोकांना पत्रकर कसं म्हणायचं असा प्रश्न निर्माण झाला असताना पुरुषोत्तम
रानडेंसारखं व्यक्तिमत्व हा एक आशेचा किरण नक्कीच आहे असं आवर्जून म्हणावसं वाटतं.
महाराष्ट्र
साहित्य परिषदेने जाहिर केलेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि
उज्वल पत्रकारीतेसाठी मन:पुर्वक शुभेच्छा!
अभिप्राय - १
-
“आत्माची डायरी” – एक मनाला भिडणारा अनुभव “आत्माची डायरी” हे आत्माराम परब
लिखित पुस्तक वाचताना मन खरंच भारावून गेलं. जीवनाच्या वाटचालीतील चढ-उतार,
आत्म...
1 week ago