नवीन
वर्षा तुझ्या स्वागता
अधीर
होऊन आलो पुढती
धीर द्यावया रवीही आला
नटली ही बघ सारी धरती
पुन्हा नवे बळ घेऊन येती
रवीकिरणे अन् उषा नवी ही
नवोन्मेष हा नव्या युगाचा
नेईल मजला पुढती पुढती
सुत्रधार तो एकच आहे
काळापुढचे जाणून आहे
भूमिका त्याने माझी रचिली
असेल किंवा नसेल रुचली
असा असे हा खेळ चालला
रचला जातो हा जीवनपट
हसून करावे त्याचे स्वागत
हसून करावे त्याचे स्वागत
नरेंद्र
प्रभू
०१/०१/२०२०
No comments:
Post a Comment