तुझे
सर्वरंगी रुप उदारा
कळले
सांग कुणाला
खेळ तुझा न्यारा
या
ओळींची आठवण करून देणारी आजची संध्याकाळ. सकाळपासून घोंगावणारं वादळ जास्त धक्का न
देता निघून गेलं,
ढगांनी काळवंडलेल्या आकाशाने प्रकाश आवरता घेतला आणि आम्ही घराच्या खिडक्याही बंद केल्या,
एवढ्यात पश्चिम प्रथम केशरी आणि नंतर रक्तवर्णात न्हावून निघाली. दुपारच्या ‘निसर्ग’
नंतर आताचा हा निसर्ग केवळ अप्रतिम. शेवटचं छायाचित्र पुर्व दिशेचं.
No comments:
Post a Comment