कितीक हळवे दवबिंदू हे गोठूनिया गेले
मोत्यांची जणू रास पसरली आगंतूक झाले
वाटांचे जणू हार जाहले धरित्री ल्यालेली
स्वर्गीचा हा अपूर्व खजिना उन्हे त्यात पडली
चमकत होते हिरे पाचू ते अथांग पसरले
रविकिरणांनी धावत येऊन त्यांना आवरले
उचलून नेले स्वर्ग सुख ते गेले मागुती
जणू स्वप्नातीत हा देखावा लागला ना हाती
अशीच असते रास धनाची सामोरी येते
असते मीथ्या दिसते आणिक निघुनिया जाते
कुठून आले कसे अवतरले कळे न मजला ते
केवळ ब्रह्म सत्यं जग हे सारे आभासी होते
नरेंद्र प्रभू
०२ मे २०२४
No comments:
Post a Comment