ईशा टुर्सच्या नुकत्याच पार पडलेल्या सिधुदुर्ग सहलीची एम.जी.फडके यांनी काढलेली ही छायाचित्रं आणि महिती. सहलीच्या आठवणी जपून ठेवण्याची आणि दुसर्यांनाही त्याचा आनंद देणाची ही वृती उल्लेखनीय आहे. धन्यवाद फडके साहेब.
![]() |
| आंबोलीचा कावळेसाद - इथे कावळ्याने साद घातल्यावर त्यालाही प्रतिसाद मिळत असावा ! |
![]() |
| तर ही झाडं आहेत आंबोलीतल्या हिरण्यकेशी (पार्वती ) च्या एका देवराईतल्या मंदिराच्या परिसरात . देवीच्या मूर्तीखालून हिरण्यकेशी नदीचा उगम आहे जी पुढे कर्नाटकात कोन्नूर येथे घटप्रभेला मिळते . |
![]() |
| कोचर्याजवळच्या निवती किल्यावरून (टेहळणी बुरुज ) डावीकडे भोगवे बीच |
![]() |
| कुडाळ तालुक्यातल्या वालावल गावातलं चौदाव्या शतकात बांधलेलं यादवकालीन लक्ष्मीनारायण मंदिर . |
![]() |
| मंदिरासमोर काळ्या पाषाणातले पांच दीपस्तंभ आहेत . एका देवळात इतके दिपस्तंभ प्रथमच पाहिले . |
![]() |
| दीपस्तंभ तोलून धरणारे हत्ती , मूर्तीसमोरचा मारुति आणि गरूड तसंच प्रत्यक्ष मूर्तीही अत्यंत सुबक आहे . |
![]() |
| कर्ली नदी आणि समुद्र यांच्या संगमाजवळचं संगम बेट आणि त्यासमोरचा सॅन्डबार ( दांडी ) |
![]() |
| देवबागला कर्ली नदी समुद्राला मिळते तिथलं एक बेट , समुद्रकिना-यावर मेजवानी झोडण्यासाठी जमलेले सीगल पक्षी , विस्तीर्ण आणि स्वच्छ वाळू आणि अर्थातच सूर्यास्त ! |
![]() |
| देवगडमधलं कुणकेश्वर म्हणजे कोकणातली काशीच ! ११व्या शतकातलं यादवकाळातलं हे मंदिर , शिवाजी राजे येथे अनेक वेळा दर्शनाला आल्यामुळे खूप प्रसिद्ध झालं असावं . |

![]() |
| देवगडच्या वाटेवर मिठमुंबरी बीच |
![]() |
| विजयदुर्गाचं मोटरबोटीतून दर्शन |
![]() |
| आणि हा जिल्ह्याचा मानबिंदू - सिंधुदुर्ग ! |
![]() |
| गावच्या मानक-यांचे खांब ( छायाचित्र मोठं करून पाहिलं तर मानक-यांची नांवं दिसतील |
![]() | |||











































