सिंधुदुर्गच्या भूमीवर पाय ठेवल्याबरोबर लगेच सुचलेली ही कविता:
इथे मातीला सुगंध सुटतो
क्षितिजाचीही झालर होते
खळखळ वाहे निर्झर इथला
जगण्याचे मग गाणे होते
वाटा दूरवर नेती इथल्या
शांत जलाशय विहंग उडती
आठवणींचा पट उलगडतो
पाण्यावर जणू तरंग उठती
सागरतीरीची वाळू इथल्या
गूज प्रीतीचे पुन्हा सांगते
डुलवत नेती नावा इथल्या
मनास येते पुरते भरते
माडबनातून झुलते पोफळ
ताल धरुनी वाऱ्यावरती
पाटामधले पाणी अवखळ
धावत असते पायाभवती
मनात करते घर कोकण हे
किती विसावा या भूमीवर
कातर काळीज म्हणत राहाते
हे माझे घर हे… माझे घर
मस्तच! मनात घर करणारी कविता!👍👍
ReplyDeleteसुंदर माझं घर!!
ReplyDelete