कोकणाकडे नेणारा रस्ता आणि आत्माने (Atmaram Parab) काढलेले फोटो पहाता पाहाता त्याची कविता बनून गेली...
आठवणीने शहारले मन कधी जावे त्या गावात
धरला रस्ता धावतसे मन गातो मी आनंदात
हलके झाले गात्र गात्र हे सोपी वाटे ही वाट
वार्यावर मग स्वार
होऊनी इंद्राचा हो हा थाट
विहंग दर्शन दूर
दिसे मज हिरवे तळ कोकण माझे
आतुरले मन कधीच
गेले निसटून हो हे तन माझे
पाचूने हा हार
घातला की घाटामधली ही वाट?
जलदांनी बघ धाव
घेतली गर्दी केली हो दाट
चितारला हा कुणी देखावा कुणी ओतली बघ रास
कितीक वळणे जरी
घेतली तरीही वाटे ती खास
इथे थाबूंनी आकाशाने रूप अपुले पाहिले जरी
जळही पाहे रूप कालचे भेटे त्याला उरोउरी
मनातले वन वनात
येता उसळे ते कवितेतून
सर्व छायाचित्रे: आत्मारम परब
क्या बात है नरेंद्र मस्त साजेसं वर्णन
ReplyDeleteआणि आत्मची झकास फोटोग्राफी 👌👌👌