असे वाटले गाठला हा किनारा
अशी लाट विक्राळ आता फुटे
पुन्हा घोर अंधार हा दाटला अन
वल्हवू कशी नाव हाकू कुठे?
असा घात आघात जिवावरी हा
कशी लागली आग वणव्यापरी
शिंदून पाणी जरी घातले हे
कळेना कुठे या भरू घागरी
जिवाला जिवाचा कोरा दिलासा
सरोनी पुन्हा वाट आता उरे
आरंभ याचा जेथून केला
तेथेंच आलो भरे कापरे
जळून गेले तण ते फुकाचे
उगवेलना जीव जगण्या आता
पाऊस आला देऊन गेला
रुजवेलना कोंब हा मागुता
No comments:
Post a Comment