काल आकाशाने सगळ्यांनाच रिझवलं, मग त्याची कविता झाली.
रंगले आकाश सारे
या सखीला भुलवणारे
दंगली त्याच्याच
रंगी
ती जशी राधाच का रे
रंग कुठला भावला
हा प्रश्न होता
बावळा
सारेच आले खुलूनी
येथे
खेळात रंगे सावळा
अन पिसारे फुलवणारे
मेघ ही आले सभोवती
उधळले आभाळ भर ते
रंगूनी रंगात जाती
मग जराशी लाजली ती
लालीमा गालावरी तो
पिऊनी का ते टाकले
की नभ तिलाही रंग देतो
नरेंद्र प्रभू
Thank you give me a very imp your article
ReplyDelete