ईशा टुर्सच्या नुकत्याच पार पडलेल्या सिधुदुर्ग सहलीची
एम.जी.फडके यांनी काढलेली ही छायाचित्रं आणि महिती. सहलीच्या आठवणी जपून ठेवण्याची
आणि दुसर्यांनाही त्याचा आनंद देणाची ही वृती उल्लेखनीय आहे. धन्यवाद फडके साहेब.
|
आंबोलीचा कावळेसाद - इथे कावळ्याने साद घातल्यावर त्यालाही प्रतिसाद मिळत असावा ! |
ही फुलं आहेत आजणी नांवाच्या झाडाची . इतक्या सुंदर फुलांवर मधमाश्या नाहीत नि याची फळं पक्षीही खात नाहीत . या फुलाना हात लावल्यावर माझ्या अंगाला खाज सुटली . खरंतर याचं नांव खाजणी असं केलं पाहिजे.
|
| तर ही झाडं आहेत आंबोलीतल्या हिरण्यकेशी (पार्वती ) च्या एका देवराईतल्या मंदिराच्या परिसरात . देवीच्या मूर्तीखालून हिरण्यकेशी नदीचा उगम आहे जी पुढे कर्नाटकात कोन्नूर येथे घटप्रभेला मिळते . |
|
कोचर्याजवळच्या निवती किल्यावरून (टेहळणी बुरुज ) डावीकडे भोगवे बीच |
|
कुडाळ तालुक्यातल्या वालावल गावातलं चौदाव्या शतकात बांधलेलं यादवकालीन लक्ष्मीनारायण मंदिर . |
|
मंदिरासमोर काळ्या पाषाणातले पांच दीपस्तंभ आहेत . एका देवळात इतके दिपस्तंभ प्रथमच पाहिले . |
|
दीपस्तंभ तोलून धरणारे हत्ती , मूर्तीसमोरचा मारुति आणि गरूड तसंच प्रत्यक्ष मूर्तीही अत्यंत सुबक आहे . |
|
कर्ली नदी आणि समुद्र यांच्या संगमाजवळचं संगम बेट आणि त्यासमोरचा सॅन्डबार ( दांडी ) |
|
देवबागला कर्ली नदी समुद्राला मिळते तिथलं एक बेट , समुद्रकिना-यावर मेजवानी झोडण्यासाठी जमलेले सीगल पक्षी , विस्तीर्ण आणि स्वच्छ वाळू आणि अर्थातच सूर्यास्त ! |
|
देवगडमधलं कुणकेश्वर म्हणजे कोकणातली काशीच ! ११व्या शतकातलं यादवकाळातलं हे मंदिर , शिवाजी राजे येथे अनेक वेळा दर्शनाला आल्यामुळे खूप प्रसिद्ध झालं असावं .
|
|
देवगडच्या वाटेवर मिठमुंबरी बीच
|
|
विजयदुर्गाचं मोटरबोटीतून दर्शन
|
|
आणि हा जिल्ह्याचा मानबिंदू - सिंधुदुर्ग ! |
|
गावच्या मानक-यांचे खांब ( छायाचित्र मोठं करून पाहिलं तर मानक-यांची नांवं दिसतील |
|
१५३० साली म्हणजे शिवजन्मापूर्वी १००
वर्षे , सावंत-भोसले यांचं सावंतवाडी संस्थान स्थापन होण्याच्या सुमाराला इथल्या ग्रामस्थानी
निर्माण केलेला धामापूर तलाव ! याचं एक वैशिष्ट्य म्हणजे या तलावाचं क्षेत्र कमी न
होता उलट वाढतंय ! या तलावाला २०२० चा WHIS (world
heritage irrigation site ) हा पुरस्कार मिळाला आहे! |
No comments:
Post a Comment