कोणत्याही प्रसंगाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन कसा आहे त्यावरच त्यातून आनंद मिळणार कि दुःख हे बर्याच वेळा अवलंबून असतं. भरपूर पैसे दिले म्हणजे आता आनंदी आनंद असं नसतं. बघा ना काय झालं ते. तीस- पस्तिस हजार रुपये खर्च करून बाबुराव सहलीला निघाले. पहिल्याच फटक्यात विमानतळावरचा टर्मिनल चुकले. सहलसाथी योग्य वेळी योग्य टर्मिनलवर हजर असताना त्याला आपण आहोत तिथे हजर व्हा असं फर्मावू लागले. इथेच त्यांचा मस्तकशुळ उठला. बाकिची सगळी मंडळी जागेवर हजर असताना बाबुराव मात्र भलत्याच ठिकाणी गेले होते. विनवण्या करून त्याना जागेवर बोलावण्यात आलं. तो पर्यंत बाकिच्यानी बोर्डिंग पास घेतला होता. बाबुरावाना इतरांपासून वेगळ्या ठिकाणी असलेल्या सीटवर बसावं लागलं. झालं, एवढा वेळ विमानात कसा जाणार असा त्यांना प्रश्न पडला. खर तर बाबुरावाना पुढची चांगली सीट मिळाली होती. पण वैतागायला काहीतरी कारण पाहिजे होतं ना ?
विमान गंतव्य स्थानी पोहोचलं. बाबुरावना न्यायला गाडी आली होती. पण गाडी पर्यंत जाताना अर्धा मिनिट लागणारं ऊन त्याना सहन होणार नव्हतं. त्यानी सहल साथीला लगेच प्रश्न केला तुमच्या टोप्या कुठे आहेत ? मला ऊन सहन होत नाही, समजलं ना ? सहलसाथीच्या माथ्यावरची टोपी बाबुरावांच्या कपाळी घातली गेली. पृथ्वीवरचा स्वर्ग समजल्या जाणार्या श्रीनगरच्या दल लेक मध्ये उत्तम हाऊसबोटीत बाबुरावांची राहण्याची व्यवस्था होती. त्याना तिथे नेण्यात आलं. तर थोड्याचा वेळात बाबुरावांची तक्रार आली, बाथरूमचं दार सरकावताना त्रास होतो. ( हाउसबोट मधली लाकडी दारं काही वेळा घट्ट असतात, समजुतीने सरकवली तर सरकतात. ) तिथून पुढच्या मुक्कामाला मंडळी गेली. बाबुरावांनी तक्रार करण्यासाठी कारण शोधून काढलं बाथरूमचा लाईट लागत नाही. तिथे बाथरूमचं बटण वेगळ्या ठिकाणी होतं. इतरांना सहज सापडणार्या गोष्टी बाबुरावाना तक्रार केल्याशिवाय सापडत नव्हत्या.
दुसर्या दिवशी सकाळी मंडळी तयार झाली. बाबुराव सांगितलेल्या वेळी तयार होते, पण त्यांच्या बस मधली मंडळी जरा उशिराने आली. बाबुरावांच पित्त खवळलं. आम्ही वेळेवर येतो आणि हे मात्र वेळ काढतात. समजूत घालून गाडीत बसवलं. संध्याकाळी उतरल्यावर बाबुराव तक्रारीच्या सुरात म्हणाले, सगळेजण आपापसात बोलतात, माझ्याशी कुणीच बोलत नाही. जेवणाची वेळ झाली. शाकाहारी पदार्थानंतर मांसाहारी पदार्थ ठेवले होते. बाबुराव भडकले, हे काय ? मांसाहारी पदार्थाबरोबर हे शाकाहारी पदार्थ कसे ? बाबुरावांच्या ताटात मात्र दोन्ही पदार्थ गुण्यागोविंदाने नांदत होते.
कड्याक्याची थंडी आणि उणे तपमान या मुळे एका दिवसाचा कार्यक्रम बदलून पर्यायी कार्यक्रम दिला पण बाबुराव अडून बसले. मुळ कार्यक्रमा प्रमाणे हट्टाने गेले, आजारी पडले. त्या नंतर विश्रांती घेण्या ऎवजी पैसे वसूल करण्यासाठी प्रवास केला. रात्री ताप भरला. सहलसाथीने औषध दिली, बिस्कीट, कॉफीची व्यवस्था केली.
आता परतीचा दिवस आला बाबुरावांचं तुणतुणं सुरू, आता हे आम्हाला वार्यावर सोडणार. विमानात बसले, पुन्हा रडगाणं सुरू, हे काय ? पंख्यावरची सीट मिळाली आपल्याला, खालचं काहीच दिसत नाही. दिल्लीला विमान उतरलं. बाहेर ४० अं.से. तपमान. झालं बाबुराव काळजीत पडले, या तपमानात आपण लाह्या सारखे फुलून येणार. कसं सहन करायचं ? मुंबईला प्रस्थान करताना बाबुरावांना मधली सीट मिळाली पुन्हा त्रागा. समोरच्या माणसाला भंडाऊन सोडलं. मुंबईत उतरल्यावर टॅक्सीवाला किती पैसे मागतो म्हणून कपाळाला आठ्या पडल्या.
एकूण काय संपुर्ण सहलीत बाबुराव त्रासिक मुद्रेत होते. या ठिकाणी असं झालं, त्या ठिकाणी तसं झालं. अगदीच काही नाही तर दहा वर्षापुर्वीची सहल आठवून गळा काढत होते. कशी आनंदी होणार आशी माणसं ? पेला अर्धा सरला आहे तिकडेच बघत राहीलं तर मग अर्धा भरलेला पेला दिसणार तरी कसा ?
लेखकः नरेन्द्र प्रभू
comments:
लेख छान झाला आहे. प्रत्येक सहलीत एकतरी बाबुराव असतोच!
आपण ही कितिदा बाबूरावां सारखेच वागतो ना . असं करायला नको त्यातल्या त्यांत काय़ चांगलं आहे ते बघितलं पाहिजे .
Chetana's comments
I like your poems. Really every one is waiting for rain.
In your blog photos .& descriptions is really very nice.....
Thanks for sending me such a nice mail...
Regards,
Chetana.
PRABHUDA,PRABHUDA TUMHI DHANNYA AAHAT!!!!!KITI MAST LIHALA AAHE, GR8.REKHATAI, MAHESHDA
I ahve realised now, many times I also act like Baburao.
अडेलतट्टूपणा हा स्वत:ला तसेच इतरांनाही त्रास देतो. त्यातून ’मी’ ची बाधा म्हणजे मग सगळाच वांधा.
छान.
लेख छान झाला आहे. प्रत्येक सहलीत एकतरी बाबुराव असतोच!
ReplyDeleteआपण ही कितिदा बाबूरावां सारखेच वागतो ना . असं करायला नको त्यातल्या त्यांत काय़ चांगलं आहे ते बघितलं पाहिजे .
ReplyDeleteChetana's comments
ReplyDeleteI like your poems. Really every one is waiting for rain.
In your blog photos .& descriptions is really very nice.....
Thanks for sending me such a nice mail...
Regards,
Chetana.
I ahve realised now, many times I also act like Baburao.
ReplyDeleteअडेलतट्टूपणा हा स्वत:ला तसेच इतरांनाही त्रास देतो. त्यातून ’मी’ ची बाधा म्हणजे मग सगळाच वांधा.
ReplyDeleteछान.