पुन्हा पुन्हा आकाशाकडे
पहावसं वाटतं मला
असाच अवचित पाऊस येईल
भिजावसं वाटतं मला
मग पावसाचे टपोरे थेंब
झेलावेतशे वाटतील मला
मग पाण्याच्या प्रवाहात
खेळावसं वाटेल मला
बंध तोडुन नदी वाहेल
धावत जाऊन पाहीन तिला
धरीत्रीचा हिरवा शेव
मंद वारा घालील मला
पण, मृगात निरभ्र आकाश
घामाने चिंब भिजवलं मला
कृष्ण मेघ कधी एकदा
पाहीन असं झालय मला
नरेन्द्र प्रभू
No comments:
Post a Comment