दुपारी ट्रेनमध्ये असतानाच माझे मित्र विनायक सराफ यांचा फोन आला, काळजीच्या स्वरात ते म्हणाले की जपानमध्ये जोरदार भुकंप झाला आहे. मी ही चिंताग्रस्त झालो कारण आमचे मित्र कॉर्पोरेट लॉयर नितीन पोतदार जपानच्या दौर्यावर आहेत. दुरचित्रवाणीवर बातम्या पाहिल्या आणि प्रसंगाचं गांभिर्य खुपच वाढलं. मोबाईलवर रिंग सुद्धा जात नव्हती, काय झालं असेल याची सारखी काळजी वाटत होती. शेवटी प्रगतीचा एक्स्प्रेस वे हे पुस्तक आठवलं, त्या पुस्तकात दिलेल्या घरच्या फोनवर फोन केला आणि नितीनजी सुखरूप असल्याचं समजलं. आता तासापुर्वी त्यानी त्यांच्या वेबसाईटवर एक व्हीडीओ टाकलाय तो पाहून समाधान वाटलं. जपान मध्ये जे झालं ते भयंकरच आहे.
आपल्या देशात सुनामी आली तेव्हा मी असाच आन्ध्रप्रदेश मध्ये होतो आणि तिकडे दोन जिल्ह्यात हाहाकार माजला होता. पण मी हैदराबादला असल्याने मला काही त्रास झाला नव्हता. नितीनजी टोकीयोमध्ये असल्याने तिकडे भुकंपझाला असला तरी सुनामीचा त्रास झालेला नाही. ते काय म्हणतात ते प्रत्यक्षच खालील व्हीडीओ मध्ये समजेल.
No comments:
Post a Comment