|
'रन'विर |
तो एक क्षण आणि त्यानंतरचा सगळा वेळ केवळ अनंद आनंद आणि आनंदानेच भरून राहिलेला होता. विजयाची झिंग काय असते ते काल सार्या भारताने अनुभवलं. विश्वचषकाच्या सगळ्या प्रबळ दावेदारांना चीत करत काल क्रिकेटच्या पंढरीत भारताच्या विरांनी झळाळता चषक उंचावला तेव्हा खरच आकाश ठेंगणं वाटू लागलं. संघनायक ढोणीने षट्कार लगावून चेंडू प्रेक्षकात भिरकावला तेव्हा फटाके फुटत राहीले आकाशात आणि मनातही.
|
उधाण आनंदाचे |
सहावा वल्डकप खेळणारा सचीन आनंदाने उसळत होता आणि त्याचे सहकारी त्याला डोक्यावर घेवून नाचत होते. देवदुर्लभ असा तो क्षण याची देही याची डोळा पाहिला आणि उर भरून आला. हा विजय रडत रखडत नव्हता तर सहा गडी राखून मिळवलेला दणदणीत विजय होता. प्रचंड महागाई आणि घोटाळ्यांचे षट्कार अशा काळवंडलेल्या वातावरणात अख्या देशाने जल्लोष करावा असा क्षण ज्या खेळाडूंनी दाखवला त्यांना मानाचा मुजरा आणि मन:पुर्वक अभिनंदन...!
|
याचसाठी केला होता अट्टाहास...! |
|
बाप माणूस |
No comments:
Post a Comment