17 April, 2011

चिमणं घरटं बाधू द्या...!




काही वर्षांपुर्वीपर्यंत घराच्या आजूबाजूला सतत चिमण्यांचा वावर असे, कित्येकदा पहाटे जाग यायची ती त्यांच्या चिवचिवाटानेच. पण आता त्या सगळ्या आठवणीच शिल्लक राहिल्या आहेत. जेव्हा त्या चिमण्या होत्या तेव्हा त्याचं महत्व वाटायचं नाही. पण असे पक्षी, प्राणी दिसले की नकळत आपल्या मनावरचा ताण हलका होतो. सहजीवनासाठी ते अवश्यकही आहे. असं असलं तरी चिमण्यांना घरटं बनवण्यासाठी सोयीचे ठरणारे आसरे जसे कमी कमी होत गेले तसा त्यांनी शहरातून काढता पाय घेतला असावा. मोबाईल टॉवर आणि फ्रिक्वेंसी मुळे चिमण्यांची संख्या रोडावली असं म्हटलं जातं पण परवा बांद्रा कुर्ला कॉम्लेक्समध्ये गेलो असताना तिकडे बांधकामं चालू आहेत त्या बाजूला चिमण्यांची उपस्थिती बर्‍यापैकी जाणवत होती. याचा अर्थ त्यांचे खुराडे करण्याच्या जागा नाहीश्या झाल्याने त्या आता दूर निघून गेल्या आहेत.

जे चिमण्यांचं तेच माणसांचंही, मुंबईसारख्या शहरात नवा संसार थाटायला गेलं की जागेचा गहन प्रश्न उभा राहातो. चाळ, वन-रुम-किचन, वन-बि-एच-के या गोष्टी नव्याने होताना दिसत नाहीत आणि जुन्या झापाट्याने पाडल्या जात आहेत. या सगळ्यामुळे कमी उत्पन्न गटातील नव्याने संसार थाटणारी मंडळी हद्दपारच होत आहेत. नव्या संसाराची गोड स्वप्न पाहायची तर स्वस्थ झोप लागेल असा आशियाना तरी मिळाला पाहिजे ना? 

1 comment:

  1. श्री. प्रभू ,

    ' चिमण्या ' या विषयावरील आपला लेख आवडला.
    त्या दुर्मिळ होत असल्याने अलिबागला माझ्या मुलाच्या घराबाहेरील झाडावर बसलेल्या
    एका चिमणीचे गेल्या महिन्यातच मी केलेले चित्रीकरण सोबत पाठवीत आहे.

    - श्री. वि. आगाशे

    ReplyDelete

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates