या वर्षी ही जोडी जरा उशीराच आली. कुणी जाल का, सांगाल का ? अशी आर्जवंसुद्धा करावी लागली. पण एकदा आल्यावर ताना मारण्यात कोकीळ जराही कमी पडला नाही. पंधरा दिवसांनंतर लडाखहून परतलो तर पाहूणे मंडळी गायब झालेली होती. (तशी ती होणारच होती म्हणा. अजून त्यांनी प्रकृतीधर्म सोडलेला नाही)......... आता पुन्हा वसंताची वाट बघायची.
कोकीळा (मादी) |
कोकीळ (नर, हाच गातो) |
साद त्यांनी ऎकली, अन
साथ मजालाही दिली
सरल्या वसंतात ती
गोडी अवीट वाटली
ऋतुराज आता संपला
घनमेघ गगनी दाटला
कोकीळकवीचा आजला
स्वरभारही तो लोपला
शब्द जो मजला दिला
परतून होईल सोहळा
कवी कोकीळ वसंतातला
लावील सकलांना लळा
कुणी जाल का, सांगाल का ?
No comments:
Post a Comment