दिवाळी अंकांची चाहूल लागायच्याआधीच ‘मुक्तांगण’ हा आचार्य अत्रे कट्टा कांदिवली
यांचा वर्धापन दिन विशेषांक हाती आला आणि दिवाळी पुर्वीच साहित्याचा फराळ मिळाला.
एखादया उत्कृष्ट दिवाळी अंकाचा दर्जा असलेला हा विशेषांक आहे. विविध विषयांवरच्या
वाचनीय साहित्याने सजलेला हा अंक म्हणूनच संग्रही ठेवण्या सारखा आहे.
आचार्य अत्र्यांच्या दातृत्वाच्या कहाण्या सांगणारा
श्रीधर भटांचा लेख पहिल्यांदाच अंकाची उंची सांगून जातो. मग सलील कुलकर्णी यांचा
अभ्यासपुर्ण लेख हिंदी ही राष्ट्रभाषा असल्याचा गैरसमज दुर करतो. या लेखातही सुरेश
भट आपल्याला भेटतात. माहिती तंत्रज्ञानाच्या या युगात तरूण पिढीला इंटरनेटचा
लागलेला नाद आणि आधीच्या लोकांना असलेला तिठकारा धनंजय गांगलांनी नेमका टिपला आहे.
अण्णा हजारेंच्या आंदोलनामुळी हे दोन्ही गट कसे एकत्र आले याचं वर्णन मुळातूनच
वाचण्याजोगं आहे.
गगनाला भिडणारी महागाई, रोजच्या रोज मोठ्या प्रमाणात
बदलणारे सोन्याचांदीचे भाव आणि एकूणच अर्थनीति विषयी आता शस्त्रक्रियेचीच गरज आहे
अस साधार स्पष्ट करणारा ‘अर्थपुर्ण’ मासिकाचे संपादक यमाजी मालकर यांचा लेख गोधळलेल्या मनाला उपाय
सुचवतो. पं. भिमसोन जोशींच्या ह्रदय आठवणी सांगणारा ‘सुर्योदयालाच सुर्यास्त झाला’ हा लेख पंडीतजींच्या विषयी आजवर
माहित नसलेल्या काही गोष्टी सांगून जातो. भिमसेन जोशी हा संगीत सुर्य तळपायच्या
आधी किती साधना करीत होता आणि प्रतिथयश झाल्यावरही किती नम्र होता हे वाचून
पंडीतजीं विषयीचा जिव्हाळा आणखी वृदिंगत होतो. संगिताचे दुसरे पुजारी आणि आपल्या संवादिनी वादनाने अवघ्या महाराष्ट्राला
वेड लावणारे गोविंदराव टेंबे आपल्याला भेटतात ते ‘स्वरविलासी वादक” या लेखात. ‘आई’ या हळूवार विषयावर लिहितात ते येरवी अर्थवृत्तांतात भेटणारे
चंद्रशेखर ठाकूर.
वरील मान्यवर आणि काही निमंत्रितांचे चांगले लेख या
बरोबरच अनेक नवोदीतानाही संपादकानी लिहिते केले आहे, तसच त्या सर्व लेखांमध्ये थोरांच्या
विचारांचं संकलन करून रांगोळी घातली आहे ती स्वत: संपादक राजेश गाडे यांनी.
रोजच्या धावपळीच्या जीवनात समाज कार्यासाठी आता कुणाला वेळ काढता येतो? अशी सबब
पुढे न करता, अत्रे कट्टा कांदिवलीच्या सर्व सभासदांनी आणि संस्थापक व मुख्य
संयोजक, तसच संपादक राजेश गाडे यांनी हा वर्धापन दिन विशेषांक देखणा आणि वाचनीय
होईल याची काळजी घेतली आहे त्याला दाद दिलीच पाहिजे.
नमस्कार राजेशजी,
ReplyDeleteमाझ्या ब्लॉगवर आपलं सहर्ष स्वागत...!