
तर आज आत्ता आमचं विमान मुंबईहून निघून दिल्लीत काही वेळासाठी थांबलं आहे. थोड्या वेळाने ते गुवाहाटीसाठी रवाना होईल, घाई नाही पण मला शक्य तेवढ्या लवकर तिकडे गुवाहाटीला पोहोचायचं आहे. गडबड, गोंधळ या पासून दूर एक अनोखा प्रदेश माझी वाट पाहात आहे. मुख्य म्हणजे माझा प्रिय मित्र आत्मा (मित्र हो,..., हे महा भारी प्रकरण आहे.) मला भेटणार आहे. पण हे गुपीत मी माझ्या मनातच ठेवलय, बरोबरच्या मंडळींना त्याचा अजून थांगपत्ता नाही. असो त्याला अचानक पाहिल्यावर काय होतं बघूया.
आला..... आत्माचाच फोन आला...... .... .... ......
चला, हा कोलकात्याच्या विमानतळावर पोहोचतोय, आमचं विमान उडण्याची तयारी झालीय, आता लॅपटॉप बंद करावा लागणार तेव्हा पुढचा वृतांत नंतर देईनच. तुर्त थांबावं लागतय.
आपलाच रोजचा मित्र, पण तो वेगळ्या प्रदेशात भेटणार, यातही एक वेगळी मजा असते. तिथे गेल्यावर एका छप्पराखालची माणसं एकाच घरातील होवून जातात. बघूया काय होतं ते, आत्मा सोडून बाकी सार्यांची अजून तशी सारखी ओळख व्हायची आहे. हो.. दांडेकर साहेब आधीपासून परिचयाचे आहेत. असो.
इलेक्ट्रॉनीक उपकरणं बंद करा अशी सुचना झाली तेव्हा हे आता बंद करतो. पण आता मला तिकडे गुवाहाटीला आत्मा भेटणार की काझीरंगाला ?