प्रेम कुणावर करावं?
प्रेम...
योगावर करावं
भोगावर करावं
आणि त्याहूनही अधिक
त्यागावर करावं.
कुसुमाग्रजांच्या कवितेतील या ओळी प्रेम म्हटलं की सहज ओठावर येतात. व्हालेंटाईन डे च्या निमित्ताने किंबहूना त्या निमित्त मांडलेल्या बाजारामुळे या गोष्टीकडे अधिक लक्ष वेधून घेतलं गेलं. प्रेम कुणावरही करावं..... पण भोगावर करता करता योगावर करावं आणि त्याहूनही अधिक त्यागावर करावं हे आताशा विसरलं जावू लागलय. योग तर कधीचाच दूर गेला, त्याग फक्त दातृत्वाचा केला गेला आणि भोग हा एकमेव प्रेमाचा विषय झाला. भोग, त्यासाठी लागणारा पैसा या मागे माणूस लागला आणि स्वत:वरच प्रेम करायला विसरला. प्रेम दुसर्यावर करावं पण त्याहूनही अधिक स्वत:वर करावं. स्वत:च्या प्रकृतीवर करावं, स्वत:च्या सकारात्मक वागणूकीवर करावं, मित्रामित्रांमधल्या दृढ नात्यांवर करावं, जगण्यासाठी लागणार्या साधनांवर करावंच पण त्याही पेक्षा अधिक स्वत:च्या जगण्यावर करावं. मित्रांनो आपण हे जगणच हल्ली विसरून गेलोय. तेव्हा व्हालेंटाईन डे च्या निमित्ताने एक प्रेमळ आर्जव आहे:
प्रेम भोगावर करावं
त्यासाठी लागणार्या साधनांवर करावं
आणि त्याहूनही अधिक
आपल्या जगण्यावर करावं.
No comments:
Post a Comment