06 April, 2012

साय

सहलीत मन मोकळी होतात, माणसं मनापासून मनातलं बोलतात. नकळत मनातल्या व्यथा-कथा सांगून जातात.असच एका आनंदयात्रेत मला माय लेकरू भेटलं. लेकराच्या आसवांच माय कौतूक करत होती आणि ते करत असतानाच मनातल्या मनात सुखावत होती. कड्यावरून पडल्याच्या वेदना अजून ताज्या होत्या, पण तीला अप्रूप होत ते लेकीच्या आसवांचं. ते अश्रूच तीच्या दुखर्‍या जखमेवरचं मलम होतं. त्या वरुन सुचलेली ही कविता.      


04 April, 2012

आनंदयात्रा





यायच्या आधीच मला पुन्हा जायची ओढ लागली
येण्या जाण्याची वाट खुप खुप आवडायला लागली

हे माझं जाणं म्हणजे जीवन गाण असतं
क्षणा क्षणाला खरंच सांगतो फक्त जगणं असतं

जीवनाचा खरा अर्थ समजत जातो
ती आनंदयात्रा करताना जगण्यातला शीण नाहीसा होतो

दूरवरच्या प्रदेशात रममाण होत जातो
नवनव्या माणसांच्या गराडयात माणसं वाचत जातो

ती माणसं वाचता वाचता घर आठवायला लागतं
घ्ररचं माझंच माणूस मला नव्याने जाणावंसं वाटतं

माझ्या वाटेकडे डोळे लावून बसलेलं माझं घर
मी असतो दूर दूर अंतरावर

परत फिरताना असते घराची ओढ
आणि कमावलेल्या अनेक माणसांची जोड   
 

01 April, 2012

ती वाट नवी


सहलीच्या वाटेवर असताना क्षण कसे भुर्र........कन उडून जातात. हवे हवे असे वाटणारे ते दिवस मग एक जपून ठेवावी अशी आठवण बनून जातात. ती वाट सतत आठवत राहाते. पुन्हा पुन्हा त्याच वाटेवर जावेसे वाटत राहाते.



LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates