यायच्या आधीच मला
पुन्हा जायची ओढ लागली
येण्या जाण्याची वाट
खुप खुप आवडायला लागली
हे माझं जाणं म्हणजे
जीवन गाण असतं
क्षणा क्षणाला खरंच
सांगतो फक्त जगणं असतं
जीवनाचा खरा अर्थ समजत
जातो
ती आनंदयात्रा करताना
जगण्यातला शीण नाहीसा होतो
दूरवरच्या प्रदेशात
रममाण होत जातो
नवनव्या माणसांच्या
गराडयात माणसं वाचत जातो
ती माणसं वाचता वाचता
घर आठवायला लागतं
घ्ररचं माझंच माणूस
मला नव्याने जाणावंसं वाटतं
माझ्या वाटेकडे डोळे
लावून बसलेलं माझं घर
मी असतो दूर दूर
अंतरावर
परत फिरताना असते
घराची ओढ
आणि कमावलेल्या अनेक
माणसांची जोड
No comments:
Post a Comment