नुकताच कोकणात कुपवड्याला माझ्या मित्रासोबत जाऊन आलो. आत्माच्या घरात बसून
तिथल्या तुफान पावसाची मजा लुटली. दूर क्षितिजापर्यंत तिथे फक्त पावसाचीच सत्ता
होती. यांदा तो सुरू झाल्यापासून थांबलाच नाही. आम्ही गेलो तेव्हाही तो तसाच पडत
होता, संततधार.
या पावसाला पाहून सुचलेली
कविता.
काळे काळे ढग मोठाले
उंच टेकड्यांवरती
लख्ख विजेचा प्रकाश पडता
खग़वर कंपीत होती
तरूवर झुलती थेंब टपोरे
आली आभाळाला भरती
ओलेते ते वस्त्र नेसली
हिरवी झाली धरती
सोसाट्याचा वारा सुटता
जलधारा नर्तन करीती
अवचीत येते जोराची सर
तांबूस माती वरती
डोंगररांगा फुटले पान्हे
तुडूंब भरूनी नद्या वाहती
हा हा म्हणता हिरवे मळे
जलमय कि हो होती
असा मत्त... उन्मत्त नजारा
दाही दिशांनी करीतो मारा
धुंद खेळता गार वारा
सुखवून जाई पिका शिवारा
नरेंद्र प्रभू
No comments:
Post a Comment