गोव्याच्या सांकृतीक जीवनात देवळांचं महत्व अनन्यसाधारण
आहे. अनेक उत्सव पारंपारीक प्रथानुसार अगदी उत्साहात साजरे केले जातात. असाच एक
उत्सव कवळ्याच्या शांतादुर्गा मंदीरात सुरू आहे. ‘भागवत सप्ताहा’च्या निमित्ताने
गेले सहा दिवस चालू असणार्या या उत्सवाची उद्या सांगता होणार आहे. अगदी
पहाटेपासून सुरू होणारी पुजा-आर्चा, नंतर भागवत कथेचं संहितावाचन, मग आरती, प्रसाद
सायंकाळी चार वाजता निरुपण, आरती, लालखी, पालखी असा अगदी रात्रोपर्यंत चालणारा भरगच्च
कार्यक्रम मंदीरात चालू असतो. गोव्यातले, गोव्याबाहेर गेलेले महाजन, आजूबाजूच्या
गावातली जनता आणि पाहूणे-रावळे दिवसभरात दर्शनासाठी येत रहातात.
सौ. व श्री. पांडुरंग नाडकर्णी (देवस्थानचे अध्यक्ष) ज्यांच्या निमंत्रणामुळे आम्ही या संधीचा लाभ घेवू शकलो. |
अमाप उत्साह आणि तेवढीच शिस्त हे या सोहळ्याचं आणखी एक
वैशिषट्य. सात दिवस रोज पाच तास चालणारं ह. भ. प. मकरंदबुवा रामदासी यांचं निरुपण
ऎकायला जमणारी गर्दी ही श्रोतृवर्ग कसा असावा याचं उत्तम उदाहरण आहे. श्रवणाची कला
हरवत चाललेल्या आताच्या काळात ही गर्दी नन्हे तर दर्दी माणसांची भक्तीरसात न्हावून
निघालेली मैफील पाहून धन्य वाटतं.
शांतादुर्गा देवस्थानचा निर्मळ परीसर, मंगलमयी वातावरण,
फुलांच्या सुगंधाचा घमघमाट आणि घंटेचा निनाद, टाळ-मृदुंगाची धुन, सनईचा मंजूळ स्वर,
धुपाचा दरवळ या सगळ्या वातावरणात घटकाभर म्हणून आलेल्याला खिळवून ठेवण्याची ताकद
आहे.
गोव्याचा हा सांकृतीक वारसा जपणारी ही मंदीरं, तिथले लोक आणि
कलाकार यांचा नित्यनेमाने चाललेला कुळाचार पाह्ण्याची, अनुभवण्याची संधी जेव्हा
केवा मिळेल तेव्हा अवश्य घ्यावी मरगळलेल्या मनाला तजेला आणि आठवणीमधून धुसर होत
जाणारा सांकृतीक पट पुन्हा एकदा उलगडवून दाखवण्याची ताकद त्यात नक्कीच आहे.
पुन्हा एकदा त्या वाटेवर
दरवळला की सोनचाफा
बहर मोगर्याला आला अन
सडा पसरला प्रजक्ताचा
पुन्हा एकदा त्या वाटेवर
भक्तीसरचा पाझर फुटला
धुप, दिप, नैवेद्य असाहा
तुम्हास देता कितीक उरला
पुन्हा एकदा त्या वाटेवर
शांतादुर्गा पालखीतुनी
देते आशिश सकल जनांना
दिसे साजीरी लालखीतुनी
No comments:
Post a Comment