कितीतरी दिवस भिमाशंकरला नेरळ-कशेळे-खांडस-काठेवाडी मार्गे
जायचा फक्त बेत आखत आम्ही बसलो होतो. माझा मित्र अतूल जाण्याचा दिवस ठरवणार आणि मग
आम्ही निघणार असं चालू होतं, पण तो दिवस
अचानक नक्की झाला आणि मी तयार झालो. फारशी तयारी न करता कैलासची
परिक्रमा पायी केल्याने मला ‘आपण जावू’ असा विश्वास होता पण सह्याद्री
काही बच्चा नाही. इथल्या पायवाटा एका गावात म्हणता म्हणता दुसर्याच ठिकाणी कधी
नेवून पोहोचवतील याचा पत्ता लागणार नाही.
चित्रकार योगेश आगिवले |
योगेशने साकार केलेलं एक चित्रं |
भल्या पहाटे निघायचं असं ठरवलं तरी नेरळला आठ वाजता पोहोचलो
आणि पहिल्यांदा हनुमानाचा प्रसाद मिळाला. त्याने पुढचा सगळा प्रवास सुखकर केला. हा
हनुमान अतूलचा मित्र. अतूलची त्याच्याशी खुप छान मैत्री असावी. अगत्याने आपल्या
घरी घेवून गेला. त्याच्या घरच्यानी हसून स्वागत केलं. बाहेरच्या खोलीत बसलो तर
भिंतीवर अनेक चित्रं टांगलेली होती. या घरात ही चित्रं आहेत म्हणजे चित्रकार पण
घरचाच असावा असं अतूलशी बोलतानाच हनुमानचा छोटा भाऊ योगेश आगिवले हाच समोर आला. ती
चित्रं त्यानेच काढली होती. एवढ्या लहानश्या गावात असा चित्रकार असावा आणि मुख्य
म्हणजे तो आपली कला जपत आहे हे पाहून खुप आश्चर्य वाटलं. त्याचा हात बरा होता.
त्याला मार्गदर्शनाची गरज आहे. चित्रकार मित्र शरद तावडे
यांच्या संपर्काचा सल्ला त्याला दिला.
हनुमानच्या घरीच आमची उत्तम अशा न्याहारीची सोय झाली. हनुमानच्या घरच्या
प्रेमळ माणसांचा अल्प सहवास लक्षात रहाण्यासारखा आहे.
पहिल्यांदा काठेवाडीला सोडतो म्हणणारा हनुमान मग आमच्या
सोबत शिडीघाटातून भिमाशंकरला यायला तयार झाला. चला म्हणजे आता वाट चुकण्याची
शक्यता नाही. लहानपणापासून दर त्रिपुरारी पोर्णिमेला आणि अधेमधे भिमाशंकरला जाणारा
हनुमान सोबत आहे म्हणून आम्ही निर्धास्त झालो. दोन तासाची डोंगरवाट चढण्याची तयारी
मनाशी केली होती. पण शिडी घाटाचा उभा चढ, थंडीने फिरवलेली पाठ आणि दुपारची चढती
उन्हं यामुळे घामाच्या धारा आणि श्वास लागल्याने
गती मंद झाली. दिड-दोन तासांची ती रपेट पार तीन तासांनी पुर्ण झाली.
भिमाशंकरचं जंगल चढताना प्रदुषणाच्या धुरक्याचा भला मोठ्ठा
पट्टा कल्याण अंबरनाथ परिसरावर पसरलेला दिसत होता. समोरची गावही त्याच्या विळख्यात
गडद होत गेली. उभ्या चढावरून आम्ही पहिल्या शिडीपाशी येवून पोहोचलो. पहिली, त्या नंतरची
दुसरी शिडी सहजच चढून गेलो. मग पुन्हा चढती, सुर्य डोक्यावर आला होता. पुन्हा एक
शिडी लागली आणि एका ठिकाणी बसायला बर्यापैकी
याच मार्गाने ट्रेक केला |
दुसर्या दिवशी भिमाशंकर- कल्याण असा सहा तासाचा एसटीचा
प्रवास किंवा शिडी घाट अथवा गणेश घाटमार्गे पुन्हा खांडस असे पर्याय होते. सकाळी मंदीरात
जावून दर्शन घेतलं आणि गणेश घाट मार्गे उतरायला सुरूवात केली. शिडी घाटापेक्षा हा
मार्ग अधिक सोपा पण दुप्पट वेळ खाणारा होता. हे असंच असतं. कठीण परिश्रम घेतले तर
लवकर यश प्राप्त होतं. पण उतरताना हनुमान सोबत नव्हता आणि शिडीघाटातून उतरणं
धोकादायक वाटलं म्हणून गणेश घाटातून उतरलो. एका ठिकाणी अतूलने थोडं पुढे जावून
निरिक्षण करायला सुरूवात केली. समोर शिडीघाट दिसत होता. काल आम्ही जे धोकादाय वळण
आणि खडक पार केलं ते दूरवर समोर दिसत होतं. त्याचे फोटो घेतले आणि आता ते पाहिले
तेव्हा लक्षात आलं की काल काय दिव्य पार केलं ते.
खुप मोठा आत्मविश्वास, दोन दिवसत भरून घेतलेली शुद्ध हवा
आणि पुन्हा एखाद्या ट्रेकला जाण्याची जिद्द मनात बाळगून परतलो. मात्र हनुमंताची
कृपादृष्टी हवीच.
No comments:
Post a Comment