शितल ऋतूची चाहूल सकाळी
संध्याकाळी जलबरसे
ऋतूचक्रही बिघडूनी गेले
ढगा आडूनी सुर्य हसे
पहाटवारा सांगूनी गेला
गुज मनीचे शितलसे
दुपार होता अचलच झाला
ढगा मागूती कवडसे
मग्न विचारी सारे झाले
कशी कुणाची झाली चूक
कसे करावे आता सांगा
चराचर सृष्टीचे कौतूक
नरेंद्र प्रभू
२१/११/२०१५
सकाळी थंडीची चाहूल लागली म्हणून मित्रवर्य प्रसाद कर्णिक यांनी कविला वॉट्सअप
केली आणि आता उकाडा आणि पाऊस सुरू झाला म्हणून ही कविता सुचली. प्रसादनी पाठवलेली कविता:
आज पहाटे जाग येता
डोळे अर्धे निजलेले
दिसे तयातून बागे मधले
फूल दवांत भिजलेले
बाहेर येता असा बिलगला
मंद जरासा शीतल वारा
रवीकिरणांना शोधित शोधित
उधळीत जाई पर्णपिसारा
मुग्ध स्वत:शी झाले सारे
कशी कुणाची पडली भूल
दंवात हसूनी पहाट सांगे
शीतल ऋतुची ही चाहूल
|| शीतल ऋतु आगमनाच्या हार्दिक
शुभेच्छा ||
No comments:
Post a Comment