श्रीनगरच्या दल सरोवरात शिकार्यातून फिरताना टिपलेली ही संध्याकाळ, सगळ्या सृष्टी
सौदर्यात असं आकंठ बुडलो असताना कुठेतरी पाकची सावलीही जाणवत होती.
नीलरंगी सांज झाली
शाम तो उतरे धरेवर
शामरंगी रंगलो मी
नीलांबरावर की जळावर
उतरून आल्या मेघमाला
त्या तरूवर नी घरावर
काठ आकंठ डुंबले ते
बहरून आले की सरोवर
रम्य संध्या एक रंगी
रंगात भिजूनी थांबलेली, अन
एक तारा त्या दिशेला
सांज होती लांबलेली
की...? कालियाने या जळावर
ओकले हे विष आहे ?
त्या तिथे माझ्या धरेवर
नापाक बसले ‘पाक’ आहे ?
नरेंद्र प्रभू
०८/११/२०१५
No comments:
Post a Comment