कवीवर्य मंगेश पाडगावकरांच्या काव्यातल्या उपमा आता पोरक्या झाल्या आहेत,
त्याना वाहिलेली काव्यांजली.
गंध फुलांचा घेऊन वारा
स्वर्गी तुझीया येईल रे
मयुर नाचरा फुलवी पिसारा
तुझ्या दर्शना व्याकूळ रे
राधे संगे शाम मुरारी
जागून सारे तुझ्याच दारी
फुलपाखरे भिरभिरणारी
तुझ्या दर्शना व्याकूळ रे
मंद मंद तार्यांची लुकलुक
तुझेच होते त्याना कौतूक
चंद्र, चांदणे तुला शोधीती
तुझ्या दर्शना व्याकूळ रे
पानोपानी तुझीच कुजबुज
झरे रुपेरी करीती लगबग
दवबिंदूंची नक्षी आता
तुझ्या दर्शना व्याकूळ रे
अशी पाखरे येती, आणि
तुझे गीत ते गाती
झाडामागे चंद्र उभा हा
तुझ्या दर्शना व्याकूळ रे
अंतर्यामी सूर विराला
श्रावणात घन निळा विखूरला
प्रितपाखरे लाऊन डोळा
तुझ्या दर्शना व्याकूळ रे
नरेंद्र प्रभू
०१/०१/२०१६
No comments:
Post a Comment