दिवस असेच सरत जातात
जगण्याला काही अर्थ नसतो
पण, एक दिवस असा येईल म्हणून
आला दिवस ढकलावाच लागतो
ते दिवस ढकलणं काल थांबलं होतं
तू आम्हाला समेवर बांधलं होतं
ढेपेवाड्याची वाकडी वाट चढण्याआधीच
मन पुढे धावलं होतं
तू बाजीराव आणि मस्त आम्ही
कधी पाटावर बसून चौरंगावर ताट ठेवून जेवलो होतो
कधी पगडी परिधान करून वाडाभर फिरलो होतो
आपुलकीने वाड्याने अंगभर खेळवलं
तिथल्या सुमधूर संगीताने मनाला रिझवलं
अनवट वाटा तुला अशाच साध्य होवोत
जगण्याला नव्या दिशा देत र्हावोत
तिथल्या वार्याची झुळूक आता वारंवार येत राहील
इथल्या फुलांच्या गंधाला तिथला सुगंध येईल
झोपाळ्याचा झुला झुलताना मला तिथेच नेईल
जगण्याला पुन्हा एकदा त्याचा ‘आत्मा’ देईल
१४/०२/२०१६
नरेंद्र प्रभू
No comments:
Post a Comment