09 November, 2016

सर्जिकल स्ट्राईक बाहेरचा आणि आतला



सप्टेंबर महिन्यात पाक अधिकृत काश्मीरमध्ये  ‘सर्जिकल स्ट्राईक’ केल्याचा पुरावा मागणार्‍यांना आता न मागताच पुरावा मिळाला असेल. ५०० आणि १००० रुपयांच्या चलनी नोटा रद्द करून तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. हा सर्जिकल स्ट्राईक कुणाकुणाच्या घरी झाला त्याची यादी पुढील प्रमाणे देता येईल.
1.     पाकिस्तान (बनावट भारतिय चलन निर्माण करून देशाची अर्थव्यवस्था पोखरणारे)
2.     दहशतवादी करवाया करणारे
3.     नक्षलवादी कारवाया करणारे
4.     राजकिय धेंड
5.     बिल्डर
6.     सर्व अवैध कामं करणारे
7.     लाचखोर सरकारी अधिकारी
8.     स्मग्लर
9.     काळे व्यापारी

ही यादी आणखीनही वाढवता येईल. काळा पैसा फक्त देशाबाहेरच गेलेला नाही तर तो देशातही आहे. याच कळ्या पैश्यावरून मोदी सरकारला घेरणारेच आता सापळ्यात अडकले आहेत. देश आता दोन गटात विभागला गेला असेल, काल रात्री शांत झोप झाली नसणारे आणि शांतपणे झोपी गेलेले. ज्याची झोप खराब झाली आहे अशांची कोल्हेकुई आता हळूहळू ऎकू येईलच.
बेनामी व्यवहार... साठेबाजी, काळाबाजार यात सर्वसामान्य लोक सहभागी नसतात उलट त्यांना लुबाडून मिळवलेला पैसा आता मातीमोल झाला आहे.  

यह है अच्छे दिन !
                
मात्र या दिवसात गरीब लोक, घरकाम करणार्‍या बाया, ड्रायव्हर अशासारख्या लोकांना आपण मदत केली पाहिजे, त्याना हा सर्व व्यवहार समजावून सांगून त्यांच्याकडे असलेल्या  ५०० आणि १००० रुपयांच्या चलनी नोटा बॅंकेमधून कश्या बदलून घ्यायच्या त्याचं मार्गदर्शन आपणच केलं पाहिजे. या कामात सरकारला जेवढी म्हणून मदत करता येईल तेवढी मदत करणं आपलं कर्तव्य आहे.     



                 

No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates