त्या वाटेवर फुले सुगंधी वेचीत असता
रुतला काटा
त्या वाटेवर बकुळ फुलांचा सडा सदोदीत
निसर्या वाटा
त्या वाटेवर निर्झर असती जीवन दायी
मध्येच खाई
त्या वाटेवर आम्रतरूंची सुंदर रायी
उंच चढायी
त्या वाटेवर तुझेच गे घर, अन हिंदोळे
जहरी डोळे
त्या वाटेवर पिठूर चांदणे कुणी शिपंडले
ढगही आले
त्या वाटेवर सावलीत मी बसलो असता
अवचीत हाका
त्या वाटेवर तुझी पाऊले नाजूक पडली
अडली घटका
No comments:
Post a Comment