रंग
सारे एक, झाले केसरी रे केसरी
पेटून
उठली एक ज्वाला केसरी रे केसरी
न्हाऊन
गेला लोक झाला केसरी रे केसरी
उधळून
दे आयुष्य त्याचा पाठीराखा तो हरी
रंग
हिरवा त्या मिळाला उजळून गेला केसरी
नीलरंगी
धाऊन आले मिसळून झाले केसरी
केसरी
रंगात जुळले लाल अन स्वेतांबरी
जनधनाची
लाज राखी आज हो हा श्रीहरी
देवभूमी
रंगात न्हाली ललाट झाले केसरी
उत्तरेचा
रंग झाला केसरी रे केसरी
पुर्वरंगी
उदयास आली लाट आता केसरी
आरक्त
दर्या आज झाला केसरी रे केसरी
नरेंद्र
प्रभू
१३/०३/२०१७
No comments:
Post a Comment