लवकरच येत आहे....
नरेंद्र प्रभू लिखित ग्रंथाली प्रकाशनाचं नवं
पुस्तक
‘हे प्रवासी गीत माझे.... आत्माराम परब
यांचा रंजक प्रवास’
या पुस्तकात
असलेली चारोळी ज्या कवितेमधून घेतली ती माझी कविता
उभा पायावर माझ्या
मनी स्वप्न माझे होते
हाती संधी आली त्याचे
सोने मीच केले होते
अशी चालता चालता
वाट सापडत गेली
गड्या तुझ्यासाठी तीही
फुले लेऊन सजली
पायवाटा माझ्या झाल्या
झाले माझेच हे घर
किती चाललो तरीही
नाही पायांना या थार
तुला दावीन आभाळ
तुला दावीन सकाळ
दिस मावळला जरी
कुठे थांबतो हा
काळ?
मला चालायाचे आहे
दूर दिशेच्या वाटेला
खंड खंड पायतळी
उर भरून भेटीला
नरेंद्र प्रभू
No comments:
Post a Comment