तिथे सृष्टीचा अपूर्व उत्सव
नसे निमंत्रण आधी रे
असा अचानक क्षण सोन्याचा
मिठीत घेता झाला रे
वर्षावातच आभाळाने
केली होती माया रे
भिजली सारी धरती आणि
भिजली सारी काया रे
लोळ धावतो खाली आणि
वीज कडाडे वरती रे
जशी अचानक आठव येऊन
काळीज कापीत जाते रे
तुडुंब भरले ओहळ नाले
सुसाट झाले पाणी रे
कधी मनाचा बांध फुटोनी
डोळा पाणी आले रे
No comments:
Post a Comment