सुप्रसिद्ध चित्रकार
रेखा भिवंडीकर यांनी श्रीकृष्णाचं अप्रतिम चित्र साकार केलं ते पाहून मला लगेच सुचलेली
ही कविता त्यांच्या कलेला अर्पण.
कृष्ण ठाकला उभा सखे ग वाजवीतो
बासरी
जसा साजीरा पाहात होती राधा ही
बावरी
लोभस कमळे अशी उमलली निळ्या सरोवरी
कमल दलेही धुंद जाहली हरीच्या
नेत्रापरी
कमला वरती कोमल पद अन पावा तो
अधरी
कमल फुलांची माला रुळते अलंकार
ते वरी
मोरपीसांचा मुकुट शोभतो हरीच्या
भाळावरी
कमलनयनी ओघळली प्रित जी राधेच्या
अंतरी
असा शोभतो मदन सखा हा लेऊन पितांबरी
शामसुंदरा तुझेच दर्शन अपार कृपा करी
नरेंद्र प्रभू
०७/०४/२०१६
No comments:
Post a Comment