“तो माका काय शिकयतलो!” या एका वाक्यात समस्त
गुरूजनांका विचार करूक लावणारी मालवणी कविता”
तो माका काय
शिकयतलो, मीच तेका शिकवीन
मास्तराच्या
हातातली पट्टी, तेच्यासकट
वाकविन
माका सांगता
आईन्सटायनान ऍपल पडताना
बगल्यान
हेना आंबो काय
आकाशातसून उडताना जिकल्यान?
तो माका काय
शिकयतलो, मीच तेका शिकवीन
माज्या वाटेक गेलो
तर लिंबू फिरवीन
नेमबाजी कसली
शिकयतास, ढपो बगलात माजो?
काजी मोजा नुसते, आताय डाव माजोच
तो माका काय
शिकयतलो, मीच तेका शिकवीन
चिपनळीतसून
तिरफळा जागेर शेकवीन
माका शिकव नको... सांगान ठेवतय
आसलस कितीय मोठो
ना..., तरी तुका पावशेरान
मोजतय
तू माका काय
शिकयतस, मीच तूका शिकवीन
बगतस काय असो, कानाखाली वाजवीन