हवे मैत्र हे एक
जिवाचे
नकोत नाती ही तुटकी
जिवाशिवाशी जडता
नाते
हवी कशाला ही रडकी?
रवीकर धरता कुणा पाहिजे
मिणमिणती पणती आधार?
उजळून टाकीन आसमंत मी
नको तुझा हा असा विखार
मी प्रकाश होऊन पुढे
चाललो
दिवाभिताचे नको प्रहार
जळून जावो जळमट सारे
हवे कुणा हे जिणे भिकार?
मी स्वयंप्रकाशी मजला
कारे
तमा कुणाची? कशास करू?
उघडी दारे दहा दिशांची
कुठे कुठे मी पुढे सरू?
वाट दावण्या समर्थ आहे
समर्थ मी जाईन पुढे
कशात आहे राम? सांगु का?
पडतील सारे इथे उघडे!
नरेंद्र प्रभू
प्रत:काळ ४.४५
१९/१०/२०१९
खूप सुंदर
ReplyDeleteखूप सुंदर
ReplyDelete