ही, माझ्या घरची वाट
इथे वहिवाट फुलांची
शुभ्र मोगरा
अन जाई ही
प्राजक्ताच्या
आरासाची
इथे फुलांचा
दरवळ दाटे
हवा हवासा
श्वासावाटे
कुणी उघडली
अत्तरदाणी
दिशादिशातून
रानावाटे
मुकुट
फुलांचे शिरी लेवूनी
उभी राहिली
रानकेशरी
आबोलीच्या
टातव्याडूनी
हळूच हासते
गुलाबराणी
इथे असे हा
निसर्ग उत्सव
हळवा पक्षी
गाणे गातो
अन
सुमानांचे गुज हासरे
कानामध्ये
मला सांगतो
नरेंद्र
प्रभू
२ ऑक्टोबर
२०१९, ललिता पंचमी
कोचरा
No comments:
Post a Comment