ईशा टुर्सचा सहभाग असलेला ‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’ हा चित्रपट विषयाची उत्कृष्ट मांडणी, कुठेही न भरकटलेला आणि विचारा करायला प्रवृत्त करणारा चित्रपट तुमच्या जवळच्या सिनेमागृहात नक्की बघा.
गोंधळलेल्या
अवस्थेकडून स्थिर अवस्थेकडे जाणारा जया देशपांडेच्या प्रवास... ‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’, नक्की बघा
तुमच्या जवळच्या सिनेमागृहात.
गजेंद्र
अहिरे दिग्दर्शित आणि सई ताम्हणकर यांची प्रमुख भूमिका असलेला "कुलकर्णी
चौकातला देशपांडे" हा मराठी सिनेमा २२ नोव्हेंबर ला प्रदर्शित झाला आहे. या
सिनेमाचे वैशिष्ट म्हणजे या चित्रपटाचं ४०% चित्रीकरण लडाखमध्ये झालं आहे आणि लडाख
मधील या चित्रीकरणासाठी सर्व logistic support ईशा टुर्सचा आहे. मराठी सिनेमाचं चित्रीकरण एवढ्या मोठ्या प्रमाणावर लडाखमध्ये
होण्याची ही पहिलीच वेळ असेल.
या सिनेमात ईशा टुर्सचा मोलाचा सहभाग आहे. या सिनेमामधील ३ गाणी शंकर
महादेवन, श्रेया घोषाल आणि अजय गोगावले यांनी
गायली आहेत. सिनेमामध्ये सई ताम्हणकर यांच्या सोबत निखिल रत्नपारखी, राजेश
शृंगारपुरे, नीना कुलकर्णी आणि २ बालकलाकारांचा
समावेश आहे. त्याचसोबत ईशा टुर्स ची स्मिता रेगे आणि आमचे अनेक लडाखी सहकारी या
सिनेमात तुम्हाला पाहायला मिळतील. आपण
पाहिलेल्या लडाखच्या आठवणी ताज्या करायची सिनेमाच्या माध्यमातून ही उत्तम संधी आहे
तेव्हा हा सिनेमा चुकवू नका.
जगभर अनेकजण काहितरी वेड घेऊन जगत असतात. झपाटून जाऊन
येणार्या दिवसाला आव्हानं देत, जगण्याची
नवी आव्हानं स्वीकारत झोकून देऊन जगण्यातच त्यांना रस असतो. पण असं जगण्याचं
वेड जर एखाद्या बाईत असेल तर मात्र परिस्थिती वेगळी असते. मर्यादा वेगळ्या असतात.
कुलकर्णी चौकातला देशपांडे या गजेंद्र अहिरेंच्या सिनेमातली जया कालपासून अशाच वेडामुळे मनात रेंगाळत राहिली आहे. सगळं काही ‘सुरळीत’ चालू असताना असमाधानी वाटणं, बेचैन वाटणं हे जगाच्या दृष्टीने वेडेपणाचंच लक्षण आहे. पिढीजात श्रीमंती असलेला नवरा, आठ वर्षांचा गुणी मुलगा आणि निवांत जगण्याची मुभा असलेलं चाकोरीतलं आयुष्य ती नाकारते. नवर्याच्या नावाने हळदिकुन्कवाचे समारंभ करण्यापेक्षा तिला हवी असतात ऊर फुटेपर्यंत झोकून देऊन पूर्ण करता येणारी आव्हानं. स्वतःच्या सगळ्या क्षमता आजमावून पाहायच्या असतात तिला. आणि मग जगण्यासाठी ती चौकटी मोडते. चाकोरितनं बाहेर पडते.
कुलकर्णी चौकातला देशपांडे या गजेंद्र अहिरेंच्या सिनेमातली जया कालपासून अशाच वेडामुळे मनात रेंगाळत राहिली आहे. सगळं काही ‘सुरळीत’ चालू असताना असमाधानी वाटणं, बेचैन वाटणं हे जगाच्या दृष्टीने वेडेपणाचंच लक्षण आहे. पिढीजात श्रीमंती असलेला नवरा, आठ वर्षांचा गुणी मुलगा आणि निवांत जगण्याची मुभा असलेलं चाकोरीतलं आयुष्य ती नाकारते. नवर्याच्या नावाने हळदिकुन्कवाचे समारंभ करण्यापेक्षा तिला हवी असतात ऊर फुटेपर्यंत झोकून देऊन पूर्ण करता येणारी आव्हानं. स्वतःच्या सगळ्या क्षमता आजमावून पाहायच्या असतात तिला. आणि मग जगण्यासाठी ती चौकटी मोडते. चाकोरितनं बाहेर पडते.
बोलायला
सहज सोपी वाटणारी,
फार प्रेरणादायी वाटणारी ही वाक्यं असतात.. ‘चौकटी मोडणे ‘वगैरे.. पण प्रत्यक्ष जगताना छातीत
जी हिम्मत लागते ती सगळ्यांमधे असतेचा असं नाही. ‘कुलकर्णी
चौकातला देशपांडे’ चित्रपटातली
मधली जया बघताना आपल्याला आसपासची अनेक माणसं आठवत रहातात. घटस्फ़ोट ही गोष्ट आजही
आपल्याकडे तोंडावर हात ठेवूनच बोलतात. नवरा मारझोड करतो, सासरचा छळ, विवाहबाह्य संबंध वगैरे कारणं असतील
तर घटस्फ़ोटही ग्राह्य धरला जातो पण माझा नवरा महत्वाकांशीच नाही, त्याला आयुष्य भरभरून जगण्यात रसच
नाही म्हणून मला घटस्फ़ोट हवा असं जेव्हा जया जाहिर करते तेव्हा तिची आई सुद्धा
तिला समाजून घ्यायला कमी पडते. ‘संसारात
तडजोडी कराव्याच लागतात बाईला..’
हे वाक्य जे जयासारख्या मुलींना सतत ऐकावं लागतं. पण अशा मुली
म्हणजे एक वेगळं रसायन असतात. ते जे वेड असतं त्यांच्यात ते त्यांना एका दगडावरून
उडी मारायला शिकवतं जेव्हा की त्यांच्या समोर त्या क्षणी असा एकही दुसरा दगड नसतो
ज्यावर त्या जाऊन उभ्या राहू शकतील. हवेत झोकून देत त्या फक्त सावरायलाच शिकत
नाहित तर एक अख्खं साम्राज्य ऊभं करायला शिकतात जिथे त्या त्यांच्या आयुष्याच्या, स्वप्नांच्या सम्राज्ञी असतात.
घटस्फोटासारख्या
एका अत्यंत शुल्लक पण आपल्या समाजाने ज्याचा ब्रह्मराक्षस करून ठेवला आहे अशा
गोष्टितनं पार जाताना बायकांची आणि त्यांच्या मुलांच्या मनांची जी आंदोलनं होत
असतात ती कुणालाही समजू शकत नाहित. परिपूर्ण होण्यासाठी स्वतःच्या स्वप्नांना
जिवंत करता आलं पाहिजे. आणि ‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’
मधली जया हेच परत परत सांगते. तिला हे कळतं की तिच्याकडे असलेली
उत्तम बुद्धिमत्ता,
उत्तम मन,
उत्तम शरीर या सगळ्याचे लाड करायला हवेत..आणि तिथंच तिचा संघर्ष
सुरू होतो.
गजेंद्र अहिरे दिग्दर्शित आणि सई ताम्हणकर यांची मुख्य भुमिका असलेला
"कुलकर्णी चौकातला देशपांडे" हा मराठी चित्रपट उत्तम भट्टी जमलेला भावनाप्रधान, समस्येची उकल करून दाखवणारा, उत्तम चित्रीकरण असलेला आणि लडाखचं सौदर्य
खुलऊन दाखवणारा एक उत्तम चित्रपट पहाच.