P.C. Atmaram Parab |
सोळा दिवसांचा लडाख दौरा, त्यात खासकरून सात दिवसांची झंस्कारची सफर स्वप्नवत होती. झंस्कारच्या आठवणी आणि विरह यातून जन्माला आलेली कविता.:
किती कवडसे होते
पडले
रानवट्यावर नव्हत्या
भिंती
आड कराया पडदा
नव्हता
आदळणारी नाती नव्हती
आभाळाचे छत मोठाले
नकोच होते छप्पर
छोटे
वारा भिरभिर फिरवीत
होता
नकळत तिथली सांजही
दाटे
चौकट नव्हती
दिवसांना त्या
कुठे जायचे कुठे
रहायचे
रस्ता अविरत दौडत
होता
वेचत होतो क्षण
सोन्याचे
आकाशीची गंगा विलसे
रात्र रुपेरी होवून
येई
जागेपणीचे स्वप्न
खरोखर
क्षणोक्षणी ते उमलत
राही
आनंदाची सोबत होती
रौद्र जरी त्या वाटा
तिथल्या
मनामनातून निर्झर
वाहे
संगम त्याचा तिथे
जाहला
नरेंद्र प्रभू