मित्रवर्य आत्माराम परब यांची छायाचित्रं आणि श्री. एम.जी. फडके यांची फर्माईश तसंच झंस्कार व्हालीचं रौद्र सौदर्य यामुळे ही कविता जुळून आली. (छायाचित्रं: आत्माराम परब आणि मामा भालेराव)
किती विशाल पर्वत, चढ्या नागमोडी वाटा
नदी खळाळत जाते जसा नागिणीचा ताठा
दूर पर्वतावरती उभा सांभ सदाशिव
कधी आशिष देतसे कधी वाटे असंभव
खिंडी मागून खिंडी अन् भयाण त्या खोल दऱ्या
लोळ मातीचा उसळे संगे सोसाट्याचा वारा
रांग रांग पर्वतांची रंग रंग नहालेली
जणू रांगोळी स्वतःच बेधुंद उधळली
आकाशीचा नील रंग कधी पाण्याने घेतला
गर्द हिरवा ही मग त्यात न्हाऊनिया गेला
गर्दी ढगांनीही केली न्याहाळती त्या धरेला
नभ उतरून आलं पट सावलीचा केला
उंच डोंगरावरती गुंफा गूढता ल्यालेल्या
स्वर्ण मंडित शिखरे शुभ्र तयाच्या जोडीला
धीरगंभीर शांतता अंगभर पसरते
रोमारोमात भरुनी आभाळाला ही भिडते
नरेंद्र प्रभू
sundar photos ani apratim kavita Prabhu da
ReplyDeleteछानच
ReplyDeleteआभारी आहे.
Deleteआभारी आहे.
ReplyDelete