अनेक अतर्क्य, अशक्य वाटणार्या कितीतरी गोष्टी आत्माराम परब या माणसाने केल्या आहेत असं मी मागच्या पोस्ट म्हटलं होतं ते याचंसाठी कारण ईशा टुर्सने लडाख बारमाही करून टाकलं आहे. मे ते ऑक्टोबर लडाखला सहली तर नेल्याच पण नंतर नोव्हेबर ते फेब्रूवारी आणि एप्रिल अशा सहली नेऊन बहार आणली आहे.
गेल्याच वर्षीच्या डिसेंबरमध्ये आम्ही मोजकेच मित्र लडाखला गेलो होतो. महामारीच्या सर्व समस्यांवर उत्तर शोशून आत्माने आम्हाला आग्रहाने तिथं नेलं होतं. तीही लडाखची एक हिवाळी सफर होती. कुठलीच बंधनं नसल्याने आम्ही मनसोक्त लडाख फिरलो. गोठलेल्या प्रवाहावर लोळण घेतली. वाट फुटेल तिकडे गेलो, जेवाचं लडाख केलं.
जपानचा चेरी ब्लॉसम जगप्रसिद्ध आहे, तसाच फुलोरा लडाखच्या अॅप्रिकॉटच्या झाडांना येतो. सगळी व्हाली फुलून जाते. सहा वर्षांपूर्वी ईशाटुर्सने ‘अॅप्रिकॉट ब्लॉसम’ च्या सहली सुरू केल्या. त्या मोसमात खरंच स्वप्नातली दुनिया पाहाता येते.
आणि मग येतो तो लडाखच्या पर्यटनाचा मुख्य सिझन लडाखचा उन्हाळा. लडाखचा उन्हाळा असं म्हटलं तरी तिथे सुखद हवामान असतं. गेल्यावर्षी कोरोनामुळे लडाखमध्ये उन्हाळ्यात जाता आलं नाही, पण या वर्षी मी चाललोय. अगदी काही तासात निघणार आहे. माझी ही लडाखची २१ वी सफर. ही सफर तर होईलच पण तीला लागून लगेच आम्ही झंस्कार व्हालीच्या सहलीला जाणार आहोत. तेव्हा मंडळी आल्यानंतर पुन्हा भेटू,
वॉर्म-अप साठी हे दहा भाग लिहिले... धन्यवाद.
भाग
१: मुक्काम तर येणारच
भाग २: ‘क्यामेरा’ क्या तेरा
भाग ३: जागेपणीचं स्वप्न
भाग ४: स्वर्गारोहण
भाग ५: पचेल तेच खावं
भाग ६: ब्रो
भाग ७: सीमा रक्षक
भाग ८: युटी (Union Territory) अच्छा है?
भाग ९: ‘आत्मा’ रंगी रंगलो
भाग १०: बारमाही लडाख
No comments:
Post a Comment