असे
निघालो सहली वरती मनात एकच आस
करू द्या आम्हा प्रवास सगळा दिवस ठरो ते खास
करू द्या आम्हा प्रवास सगळा दिवस ठरो ते खास
पहिल्या
भेटी मध्येच झाले मैत्र जीवाभावाचे
नुरले
अंतर गूज निरंतर हास्यविनोदाचे
भटकंतीला
आतुर सगळे डोळे विस्फारले
स्वप्नांच्या
गावातून फिरलो विश्वच कवटाळले
असेच
हळवे होती सगळे येतो शेवटचा हा दिस
कितीक
गेले क्षण हे सारे करिती कासावीस
नरेंद्र
प्रभू
कासाब्लांका, मोरक्को
२५/०२/२०२५
No comments:
Post a Comment