31 December, 2021

यातच मजा आहे



निवडा नवा मार्ग
यश आहे पुढं
तोडा सारी बंधनं
जोरात दौडूदे घोडं

बघा नवी स्वप्नं
लोक म्हणूदे वेडं  
त्यांच्यापासून थोडंच आहे
अडणार आपलं घोडं

म्हणतील हे वय काय
रिस्क घ्यायचं आहे?
त्यांना काय माहित
यातच मजा आहे   

पायात पाय घालू नका
हातात हात घाला
कुणी म्हणेल काळ आला
भेटूया ना त्याला

घोडं वाकडं धावलं तरी
सोडू नका लगाम
सवय झाली आता म्हणून
होवू नका गुलाम

कशासाठी जगायचं?
ठरवून घ्या पहिलं
वर्षामागून वर्षं संपली
हे ही वर्ष संपलं

कशासाठी थांबलाय
जायचंय ना पुढं?
बघा जरा निट
कुठे अडलं घोडं?

नरेंद्र प्रभू

३१/१२/२०२१



    

   

04 December, 2021

असो माजो सिंधुदुर्ग

Audio Link: असो माजो सिंधुदुर्ग




काय काय दाखव तूमका असा झाला आता माका

सिंधुदुर्गात उडान येवया चला लावा ही पाका

पाचू कवडो, राखाडी धनेश, सर्प गरूड आणि डिचो

पक्षी किती, प्राणी किती पत्तो नाय लागाचो

गवो रेडो, बिबळो, वाघ, झाडार शेखरू खाली साळींदार   

रात्री उठान गेलात रानात तर दिसता उद मांजार

हिरण्यकेशीच्या कुशीत आंबोलीक कावळे साद आसा

थंड हवेतसून इल्यार देवबाच्या येळेवर जरा बसा

भगवतीच्या पायाकडे धामापूरचा तळा

होडयेत बसान बगा दिसतत पांढरी कमळा

भोगव्याचो दर्या दाखवता किल्ले निवती

दुपार झाली तरी जावा देवराय डुंगोबावरती

केरळ कित्या व्हया तूमका बॅकवॉटर फिराक

वालावल-काळसा-भोगव्या खाडीतसून जावा तुमी घराक

चिंब भिजाक नांगरतास, सावडाव आणि नापण्याचो धबधबो

भुक लागली तर खयय घेवयामहो खानावळीत थांबो

सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, देवगड किल्लो

म्हाराज्यांच्या पदस्पर्शान पावन झाल्लो

कुणकेश्वर, रामेश्वर, वेताळ आणि काळकाय

मालवणीच्या या भूमीर कसलीच कमी नाय 

खाण्यापिण्याची चंगळ हयसर, सगळी करूया सोय    

बारमाही पर्यटन आसा बाबानू कदीय येवा हय

 

नरेंद्र प्रभू










04 November, 2021

अंतर्यामी तेओ दीप माळ

 




उजळो प्रकाश, मनाचे गाभारी

राहूदे उभारी सर्व काळ

पुन्हा उजाडले, स्वर्णमयी झाले

अंतर्यामी तेओ दीप माळ


उष:काल झाला, तिमिर निमाला

उदयाला आला रवीराया

नश्वरच होता कालचा काळोख

ईश्वरच होता सांभाळाया


सर्वसत्ताधीश जगाचा नियंता

सोडी भावचिंता जाळी देहा

उफराटे कारे मांडियले पाट

त्याने दिले ताट कसे पहा!


LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates